Uncategorized

वारंवार होणारा उचकी चा त्रास असा घालवा!

वारंवार उचकी येण्याचा त्रास असला तर माणूस वैतागून जातो. घरगुती अनेक उपायांनी देखील त्रास दूर होत नसेल तर मग तुमचे उपाय चुकत आहेत! असा पण घरगुतीच मात्र अगदी रामबाण उपाय उचकी येण्यावर शोधणार आहोत!

जेव्हा तुम्हाला उचकी येईल तेव्हा साखर पटकन खावी. उचकी येणे त्वरित थांबते आणि लगेच बरेही वाटते. अनेकदा जेवता जेवता पटकन उचकी येते आणि जवळ काहीच नसते. मात्र ताटात असलेले लिंबू तुमचे उचकी येण्याचे प्रमाण कमी करू शकते हे तुम्हाला माहित आहे काय? कोमट पाण्यात लिंबू मिसळून ते पिल्याने उचकी येण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

मदत देखील बऱ्याच रोगांसाठी उपयुक्त आहे. किरकोळ आजारासाठी सुद्धा अनेकदा मध वापरलेला आपण पाहिला असेल. कोमट पाण्यात एक दोन थेंब मध मिसळून तो पिल्याने उचकी पटकन थांबते.

जेवणानंतर बडीशेप खाण्याची परंपरा आपल्याकडे बरीच जुनी आहे. अर्धा चमचा साखर, एक चमचा बडीशेप आणि कोमट पाण्यात सेवन केल्याने उचकी येण्याचा त्रास लगेच दूर होतो. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर या उपायांना नक्की आजमावा. कोणत्याही औषधापेक्षा हे उपाय तुम्हाला नक्कीच उचकी येण्याच्या त्रासापासून मुक्तता देतील.