Uncategorized

पायलट आणि को-पायलट यांना जेवायला नसते एकसारखे अन्न; कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण!

विमान प्रवास आपल्यापैकी बरेच जण करत असतात. विमान प्रवास करत नाहीत त्यांना देखील विमान प्रवास करण्याचे कुतूहल खूप असते. आकाशातून होणारा हा विमानप्रवास पहिल्याप्रथम अचंबित करणारा वाटतो. विमान प्रवासाच्या बाबतीत अनेक गोष्टी आणि किस्से आपण आपल्या मित्रांकडून ऐकलेले आहेत. मात्र, आज आपण विमान प्रवास आणि वैमानिक यांच्या विषयी काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेणार आहोत. त्यामध्ये एक बाब अशी आहे किवी मानत असणाऱ्या वैमानिकांना वेगवेगळे जेवण दिले जाते.

आपण सगळेच जाणतो की, एका विमानात दोन पायलट असतात. पायलट आणि को-पायलट यांना दिले जाणारे अन्न हे अतिशय वेगवेगळे असते. पायलट ताटातील अन्नपदार्थ तुम्हाला को-पायलट च्या ताटात दिसणार नाहीत. यामागे असणारे कारण सुरक्षेशी निगडित आहे. आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की, नेमकी प्रवाशांची सुरक्षा आणि पायलटच्या ताटातील अन्न यांचा संबंध काय?

जर दोन्ही पायलटला एकसारखे जेवायला दिले. म्हणजे पायलट आणि को-पायलट च्या ताटात सारखेच अन्नपदार्थ असले, तर सुरक्षेचा धोका संभवतो. चुकून अन्नपदार्थांमध्ये काही गडबड झाली तर, दोन्ही पायलट एकाच वेळी धोक्‍यात येऊ शकतात. दोघांना एकाच वेळी आरोग्य सल्ल्याची गरज भासू शकते. अशावेळी प्रवाशांना विमानात पायलट शिल्लक राहणार नाही. आणि त्यांची सुरक्षा धोक्यात येईल म्हणून, पायलट आणि को-पायलट यांना कधीच एकसारखे जेवण दिले जात नाही.