Uncategorized

मुलांना शिकवा शेअरिंग इज केअरिंग!

आज-काल बदलणाऱ्या काळानुसार प्रत्येक घरांमध्ये एकच मूल असते. भावंड नसण्याची जागा ते इतर ठिकाणाहून भरून काढण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. आजकालच्या धकाधकीच्या जगात प्रत्येक जण स्वतःचा विचार करताना आढळतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी मिळेल या स्पर्धेतच प्रत्येक व्यक्ती धावण्याचा प्रयत्न करतो. हे पाहूनच आपली पुढची पिढी त्याच मार्गाने मार्गक्रमण करताना दिसते. आणि आपण मात्र मूल त्याची कुठलीच गोष्ट कोणाबरोबर शेअर करत नाही म्हणून तक्रार करत असतो. 

मुलांना गोष्टी शेअर करायला शिकवणं हे आपलं कर्तव्य तर आहेच मात्र, ती आजची गरज आहे. घरात २ मुलं असतील तर आपोआप त्यांना एकमेकांविषयी वाटणारे प्रेम, एकमेकांच्या वस्तूंची होणारी देवाण घेवाण याची सवय लागते. त्यातून शेअरिंग ची भावना आणि एकमेकांच्या असण्याची सवय लागते. मात्र, घरात एकच मुल असेल तर त्याला खालील गोष्टी शिकवा, आणि माणूस म्हणून घडवा!

१. आणलेला खाऊ घरातल्या लोकांना सुद्धा द्यायला त्याला शिकवा. यातून कोणतीही गोष्ट एकट्याची आहे हे वाटणार नाही.

२. आदर आणि प्रेम हे वय पाहून नाही तर प्रत्येकालाच द्यावे हे त्याच्या मनावर बिंबवले गेले तर तो प्रत्येकाचा आदर करेल. मित्रांचा सुद्धा!

३. मावस, चुलत भावंडं आपली आहेत आणि त्यांना शेअर करून गोष्टी तुला आनंद मिळेल हे ही त्याला अनुभवून पाहू द्या!

४. कुटुंबाच्या मध्ये बसून त्याला गप्पा मारू द्या. याने त्याची वाढ सर्वार्थाने होईल.

५. त्याच्या मनात असणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घेऊ शकता याचा त्याला विश्वास द्या. यातून त्याचा एकटेपणा दूर होईल आणि कोणीतरी असण्याची भावना त्याला मिळेल.