Uncategorized

या मराठी माणसाने जगात सर्वात पहिले विमान उडवले!

विमान म्हटलं की आपल्याला 17 डिसेंबर 1903 साली, राइट बंधूंनी विमानाचा शोध लावल्याचे ध्यानात येते. आपल्याला लहानपणी पासून शाळेत देखील हेच शिकवले आहे. पण त्याआधी देखील एक मराठी माणूस असा होता ज्याने राइट बंधूंच्या आठ वर्ष पूर्वी विमान उडवण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या मराठी माणसांचे नाव अनेकांना माहित देखील नाही.

त्यांनी केलेली कारकीर्द आणि त्याचा इतिहास सहजपणे आपण विसरून गेलो आहोत. आज आपण त्या माणसाचे नाव जाणून घेणार आहोत, जो मराठी ही होता आणि सर्वात प्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला होता. त्या मराठी माणसाचे नाव शिवकर बापूजी तळपदे अस आहे. मुंबईतील संस्कृतचे अभ्यासक तळपदे यांनी गुरु सुब्राय शास्त्री यांच्या वैमानिक शास्त्र संबंधित एका ग्रंथाच्या मार्गदर्शनाखाली विमान उडवण्याची प्रेरणा घेतली. या प्रेरणेतूनच त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.

मरुत्सखा नाव देऊन तळपदे यांनी 1895 रोजी विमानाचा प्रयोग करण्यासाठी गिरगाव चौपाटीची निवड केली. महाराजा सयाजीराव गायकवाड आणि महादेव गोविंद रानडे यांच्या उपस्थित मानवरहित विमान काही मिनिटांपर्यंत हवेत उडवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. केसरी वर्तमानपत्राने देखील या वृत्ताला प्रसिद्धी दिलेली आहे. त्याकाळी पैशाच्या आभावाने त्यांना प्रयोग पुढे नेता आला नाही. मात्र, त्यांनी प्राचीन विमान कलेचा शोध नावाचे पुस्तक लिहिले. यातून हवाईजादा नावाचा चित्रपट देखील निर्माण झाला. चित्रपट चित्रण चुकीचे करण्यात आल्याचा आरोप करून त्या विरोधात याचिका देखील दाखल करण्यात आली.