Home » विश्वास बसणार नाही पण बिहार आणि आसाममध्ये उगणारा हा तांदूळ चक्क शिजतो थंड पाण्यात…!
Uncategorized

विश्वास बसणार नाही पण बिहार आणि आसाममध्ये उगणारा हा तांदूळ चक्क शिजतो थंड पाण्यात…!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात विविध अन्नधान्य पारंपारिक व आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालून सध्या पिकवली जातात.असेच एक पीक म्हणजे तांदूळ होय. तांदूळ हा भारताप्रमाणेच अनृय देशांमध्ये सुद्धा प्रमुख अन्न म्हणून वापरला जातो. भारतातील दक्षिणेकडील राज्य, कोकण किनारपट्टी, व उत्तर भारतातील काही प्रदेशात भात हेच प्रमुख अन्न आहे.

तांदळाच्या विविध प्रजाती प्रत्येक प्रांतात आहेत मात्र त्यांच्या शिजवण्याची प्राथमिक पद्धत मात्र समान‌आहे म्हणजे भात शिजवण्यासाठी तांदूळ उकळत्या पाण्यात वाफेवर व्यवस्थित शिजवला जातो. मात्र या पद्धतीला छेद देत थंड पाण्यात‌ केवळ‌ भिजवून‌ ठेवून चविष्ट व आरोग्यदायी भात‌ निर्माण करणारी तांदळाची एक प्रजाती सध्या लोकप्रिय ठरत आहे.

या तांदळाच्या प्रजातींचे नाव आहे मॅजिक राईस. होय मॅजिक राईस हा नेहमीच्या तांदळापेक्षा खूपच भिन्न आहे. हा तांदूळ लाल, काळ्या, हिरव्या अशा रंगांमध्ये दिसून येतो. याचे सर्वात अनोखे वैशिष्ट्य म्हणजे हा तांदूळ साधारण अर्धा तास गार पाण्यात भिजवून ठेवल्यास नेहमीप्रमाणे भात तयार होतो. याची चव खुप रुचकर असून‌ आरोग्याच्या दृष्टीनेही या तांदळाचे फायदे अनेक आहेत.

मॅजिक राईसच्या सेवनामुळे वजन‌ नियंत्रणात राहते व विशेष म्हणजे मधुमेह असलेलं व्यक्ती सुद्धा या तांदळाच्या भाताचे सेवन करू शकतात. या तांदळाचे उत्पादन सध्या बिहार मधील बेथिया जवळील एका छोट्या गावात कमलेश चौबे हे प्रयोगशील शेतकरी करत आहेत. या तांदळाच्या उत्पादन करताना सेंद्रिय पद्धतीचा वापर केला जातो.

भविष्यात या मॅजिक राईसच्या निर्यातीमध्ये शेतकऱ्यांना खूप आर्थिक नफा मिळेल‌असे ते सांगतात व पारंपारिक उर्जा संवर्धन संवर्धन करण्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे. या तांदळाचा दर प्रतिकिलो 150-200 रूपये इतका आहे. बिहारप्रमाणे आसाममधील काही भागात या तांदळाचे उत्पादन घेतले जाते.