Uncategorized

तांब्याच्या भांड्यात चुकूनही खाऊ नका ‘ हे ‘ पदार्थ; आरोग्याला होईल खूप मोठे नुकसान!

आयुर्वेदामध्ये आणि धर्म शास्त्रांमध्ये सुद्धा तांब्याच्या भांड्याला मोठे महत्त्व प्रदान केले आहे. आपल्या देवपुजेपासून ते मोठ्या कार्यापर्यंत तांब्याची भांडी आवश्य वापरले जातात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे अनेकदा आपल्याला सांगितले जातात. मात्र, नाण्याला असणारी दुसरी बाजू अनेकदा लपून राहते. त्याच बाजूमुळे अनेक नुकसानाना आपल्याला सामोरे जावे लागते. हीच बाजू जाणून घेतली तर आयुष्य आणि आरोग्य दोन्हीही सुखरूप राहू शकते. आज आपण मात्र कोणते पदार्थ तांब्याच्या भांड्यात खाल्ल्याने आरोग्यास हानिकारक ठरू शकतात हे जाणून घेणार आहोत.

  1. तांब्याच्या भांड्यात तुम्ही ताक पीत असाल तर तुमच्या आरोग्यास मोठी हानी पोहोचू शकते. ताक-तांब्याची रासायनिक प्रक्रिया होऊन तयार होणारे घटक शरीरास हानिकारक ठरू शकतात.

2. कोणत्याही प्रकारचे आंबट खाद्य पदार्थ कधीही तांब्याच्या भांड्यात घेऊन सेवन केले तर नुकसान होऊ शकते. आंबट पदार्थांमध्ये असणारे आम्ल तांब्याशी रासायनिक अभिक्रिया करून शरीरात अपायकारक घटक निर्माण करतात. यातून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

3. ज्या फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते त्या-त्या फळांमधील आम्ल तांब्याशी रासायनिक प्रक्रिया करते त्यामुळे गॅस, पोटदुखी, उलट्या किंवा फूड पॉयझनिंग सारखे प्रकार होऊ शकतात.