चावंड किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. शिवनेरी, जीवधन, हडसर, नारायणगड या किल्ल्यांच्या साखळीत चावंड किल्ल्याचं नाव घेतलं जातं. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,४४५ फूट उंचीवर आहे. इतिहास चावंड किल्ल्याचा उल्लेख इ.स. १४व्या शतकापासून आढळतो. यादव, बहामनी, निजामशाही आणि पुढे मुघल अशा अनेक सत्तांनी या किल्ल्याचा वापर केला. […]