प्रतापगड किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये केली. हा किल्ला बांधण्याचे काम मोरोपंत पिंगळे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. या किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे १६५९ मध्ये येथे घडलेली अफझलखान वधाची घटना.