"धर्मवीर गड" हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमहमदनगर जिल्ल्यातील एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. याला ‘बहादूरगड’ किंवा ‘पांडे पेडगावचा’ म्हणून देखील ओळखले जाते. इ.स 13 व्या शतकात यादव कालखंडात पांडे पेडगाव हे प्रशासकीय ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते. धर्मवीर गड हा अहमदनगर जिल्ह्यातील पेडगाव गावात, भीमा नदीच्या काठावर आहे. हा किल्ला पुण्यापासून सुमारे १०० किमी आणि दौंड शहरापासून १५ किमी आहे. या किल्ल्यापासून जवळचे शहर श्रीगोंदा आहे.
या किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. गावाच्या बाजूला असलेले प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे, नदीकडील प्रवेशद्वार जीर्ण झाले आहे. या किल्ल्यावरील अनेक वास्तूची पडझड झालेली आहे. परंतु तटबंदी आणखी बऱ्यापैकी आहे. इमारतीच्या खिडक्यातून भीमानदीचे सुंदर दृश्य दिसते. हा किल्ला साधारणता ११० एकरावर पसरलोला आहे. या किल्ल्यावर आधारित दोन म्हणी आहे. "आले मोठे पेडगावचे शहाणे" आणि “येड पांघरून पेडनावला जाणे”
त्यानंतरच्या काळात बहादुरखानने या किल्ल्याची डागडुजी केली आणि किल्ल्याला स्वतःच्या नावावरून बहादूरगड असे नाव दिले. २००८ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ याला "धर्मवीर गड" असे नाव देण्यात आले.
पेडगावचा हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात एक दुर्देवी परंतु महत्वपूर्ण स्थान राखतो. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर औरंगजेबने आपली छावनी अकलूजवरून पेडगाव येथे हलवली. पेडगाव या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू मित्र कवी कलश यांना औरंजेबासमोर हजर करण्यात आले.
औरंगजेबने संभाजी महाराजांवर हिंदवी स्वराज्य सोडून मुघल साम्राज्याच्या आधीन येण्याचा दबाब आणला परंतु, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबच्या सर्व मागण्या ठामपणे नाकारल्या, यामुळे क्रोधीत होऊन औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा अनन्वित छळ केला.
किल्ल्यावरील मंदिरे: किल्यामध्ये नक्षीकाम केलेली पाच मंदिरे आहेत.. यामध्ये लक्ष्मी नारायण मंदिर सध्यादेखील चांगल्या अवस्थेमध्ये आहे.
- बालेश्वर
- लक्ष्मी-नारायण
- मल्लिकार्जुन
- रामेश्वर
- भैरवनाथ
पर्यटन आणि भेट
- कसे पोहोचाल: पुणे किंवा अहमदनगरहून श्रीगोंदा मार्गे पेडगावला जाता येते. पेडगाव गावातून किल्ल्यापर्यंत रस्ता आहे.
- पाहण्यासारखे: मंदिरे, औरंगजेबाचा महाल, पाण्याच्या वाहिन्या, आणि ऐतिहासिक सतीगल.
- सल्ला: किल्ल्याला भेट देताना स्थानिक गाइड घेणे उपयुक्त ठरेल, कारण किल्ल्याची माहिती देणारे फलक किंवा माहिती केंद्र नाही.
Responses (0 )