इ.स १६६५ मध्ये राजा मिर्झा जयसिंग यांच्या सोबत जो पुरंदरचा तह झाला होता. त्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात दिले होते. त्यामध्ये या किल्ल्याचा समावेश होता. हा किल्ला बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. हा किल्ला शिवरायांनी स्वराज्यात केव्हा सामील करून घेतला. चला तर मंग जाणून घेऊया या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती.
लोहगड किल्ला पुण्याहून ६० किलोमीटर आणि मुंबईपासून ८९ किलोमीटर अंतरावर आहे. ५ वर्ष मुघलांच्या ताब्यात असलेला लोहगड किल्ला शिवरायांनी १३ मे १६७० मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्यावर आपण तिन्ही ऋतूंमध्ये जाऊ शकतो. पावसाळ्यात हा किल्ला अतिशय निसर्गरम्य दिसतो. किल्याला भेट देण्याची वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० आहे.
समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३४२० फूट उंचीवर आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असल्यामुळे चढायला अगदी सोपा आहे. लोहगड हा किल्ला त्याच्या भव्य वास्तुकला, ऐतिहासिक महत्त्व आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
१) गणेश दरवाजा : गणेश दरवाजा हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. दरवाज्यावरील गणपतीच्या मूर्तीवरून या दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आले.
२) दिंडी दरवाजा : द्या दरवाज्यामधून आपल्याला बुरुजाच्या माथ्यावर जात येते. हा बुरुज युद्धकोणाच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचा होता.
३) महादरवाजा : महादरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. मजबूत दगडांनी बांधलेला भक्कम दरवाजा आहे.
४) नारायण दरवाजा : नारायण दरवाज्याकडे जाताना आपल्याला एक धान्यकोठी दिसते. त्यामध्ये पूर्वी धान्य साठवले जायचे. हा नारायण दरवाजा १७८९ साली नाना फडणवीसांनी बांधला होता.
५) हनुमान दरवाजा : हनुमान दरवाजा हा लोहगडाचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाज्यावर हनुमानाची मूर्ती कोर्लेलीया आहे त्यामुळे याला हनुमान दरवाजा नाव देण्यात आले असेल.
६) विंचूकडा : विंचूकडा हा विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून त्याला विंचूकडा म्हणतात. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकड्याचा उपयोग होत असावा.
७) लक्ष्मी कोठी : पहिल्या सुरत लुटीच्या वेळी आणलेला खजिना नेताजी पालकर यांनी लक्ष्मी कोठी मध्ये ठेवला होता.
८) महादेव मंदिर : या किल्ल्यावर एक महादेवाचे मंदिर आहे.
९) सोळा कोणी तलाव : महादेवाच्या मंदिरासमोर थोडसं चालत गेलो कि आपल्याला एक मोठे तळे लागते या तळ्याची बांधणी नाना फडणवीसांनी केली होती. हे तळं सोळा कोणी आहे.
१०) घोड्याची पागा : घोड्यासाठी पाणी आणि चाऱ्याची सोया या ठिकाणी केली जात असेल.
टिप:
ट्रेकिंगसाठी आरामदायक कपडे आणि चांगले शूज घालावेत.
पावसाळ्यात किल्ल्यावर जाण्यासाठी पावसापासून बचावासाठी छत्री किंवा रेनकोट ठेवावा.
खाण्या-पिण्याच्या वस्तू सोबत घ्याव्यात, कारण किल्ल्यावर फार सुविधा उपलब्ध नसतात.
लोहगड किल्ला हा निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा उत्तम संगम आहे. किल्ल्याला भेट दिल्यास ऐतिहासिक वारसा अनुभवण्याबरोबरच निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.
Responses (0 )