Home » मृ’त्यू’च्या काही तास अगोदर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती हिच्या सोबत काय घडले होते… 
Celebrities

मृ’त्यू’च्या काही तास अगोदर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती हिच्या सोबत काय घडले होते… 

बॉलिवूडमध्ये क्वचितच अशी कोणतीही अभिनेत्री असेल जिने तिच्या करिअरच्या पहिल्या वर्षात १२ चित्रपट केले असतील आणि तिचे सर्व चित्रपट यशस्वी झाले असतील.पण पुढच्याच वर्षी अभिनेत्रीचा मृ’त्यू झाला.दिव्या भारतीने तिच्या छोट्याशा कारकिर्दीत खूप यश मिळवले होते.दिव्या भारतीचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ मध्ये झाला होता.आज ती जिवंत असती तर ४५ वर्षांची असती.

दिव्या भारती यांचे वयाच्या १९ व्या वर्षी निधन झाले.दिव्या भारती यांचे ५ एप्रिल १९९३ रोजी निधन झाले.दिव्या भारतीने मृ’त्यू’च्या फक्त १ वर्ष आधी लग्न केले होते.तिने प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवालासोबत लग्न केले होते.दिव्याने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.काही लोकांनी दिव्या भारतीच्या मृ’त्यू’मागे तिचा पती साजिद असल्याचे सांगितले.५ एप्रिलच्या रात्री काय घडले ते जाणून घेऊया…

दिव्या भारतीच्या आकस्मिक निधनामुळे अनेक प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या.काही लोक याला आ’त्म’ह’त्या म्हणत होते,तर काही लोकांनी दिव्या भारतीच्या मृ’त्यू’साठी तिच्या पतीला जबाबदार धरले होते.अनेक वर्षे तपास करूनही पोलिसांना दिव्या भारतीच्या मृ’त्यू’चे खरे कारण कळले नाही आणि त्यानंतर १९९८ मध्ये तिच्या मृ’त्यू’चे प्रकरण बंद करण्यात आले.

ज्या दिवशी दिव्या भारतीचा मृ’त्यू झाला,त्याच दिवशी तिने मुंबईत ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता.करार अंतिम झाला.तिने तीचा भाऊ कुणालला ही खुशखबर दिली.त्या दिवशी शूटिंग संपवून दिव्या भारती चेन्नईला परतली.तिच्या पायालाही दुखापत झाली होती.त्या रात्री तिची मैत्रिण आणि डिझायनर नीता लुल्ला तिच्या पतीसोबत मुंबईच्या पश्चिमेकडील अंधेरी वर्सोवा येथील दिव्या भारतीच्या फ्लॅटवर आली.दिवाणखान्यात बसून तिघेही मद्यपान करत होते.पण काही मिनिटांत काय होणार हे कोणालाच कळत नव्हते.

रात्री ११ च्या सुमारास अमृता (मोलकरीण) काही कामासाठी स्वयंपाकघरात गेली.नीता पतीसोबत टीव्ही पाहत होती. त्यानंतर दिव्या भारती खोलीच्या खिडकीजवळ गेली आणि तिच्या मोलकरणीशी बोलू लागली.दिव्याच्या दिवाणखान्यात बाल्कनी नव्हती.एकच खिडकी होती,ज्याला ग्रील नव्हते.खिडकीखाली पार्किंगची जागा होती,तिथे गाड्या उभ्या होत्या.त्या दिवशी तिथे एकही गाडी नव्हती.

खिडकीजवळ उभी राहून दिव्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती.मात्र तिचा पाय घसरला आणि ती जमिनीवर पडली.पाचव्या मजल्यावरून पडल्याने दिव्या पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होती.तिला रुग्णालयात नेण्यात आले.मात्र तोपर्यंत तिचे निधन झाले होते.पोलिसांना तपासात कोणतेही पुरावे मिळाले नसून मद्यधुंद अवस्थेत छतावरून खाली पडल्याने तिचा मृ’त्यू झाल्याचे कारण समोर आले आहे.