Home » ५ हजारांची गुंतवणूक करून असा उभारला ‘पाटील काकी’ यांनी कोटींचा व्यवसाय!
Success

५ हजारांची गुंतवणूक करून असा उभारला ‘पाटील काकी’ यांनी कोटींचा व्यवसाय!

शिक्षणानिमित्त किंवा कामानिमित्त बाहेर राहणारे आजकालचे तरुण-तरुणी आईच्या हातचे जेवण मिस करतात. अश्यावेळी आईच्या हातचे लाडू, चिवडा मिळालं तरी पोट भरून जात. तसं म्हंटल प्रत्येक आई ही स्वयंपाकात सुगरणच असते. आपल्या आईच्या हाताला एक टच असतो तो सगळ्यांना खूप प्रिय असतो. 

परंतु काही अश्याही सुगरणी असतात ज्यांच्या हाताला वैश्विक टच असतो त्यापैकीच एक म्हणजे गीता पाटील उर्फ पाटील काकू! गीता पाटील यांचा गीता ते पाटील काकू हा प्रवास खूप रंजक आहे चला तर मंग आज आपण त्यांचा हा प्रवास कसा सुरु झाला ते जाणून घेऊया. 

गीता पाटील यांचे वडील महानारपलीकरत कामाला होते आणि आई लोकांना डब्बे पुरवण्याचा छोटासा व्यवसाय करत होती आणि गीता पाटील ह्या या कामात त्यांच्या आईची मदत करत असत. हे काम करत असतानाच त्यांच्यावर काळात नकळत सुगरण स्वयंपाकाचे संस्कार झाले. 

पुढे त्यांचे लग्न झाले व त्यांना दोन मुले झाली. त्या त्यांच्या मुलांना डब्ब्यात वेगवेगळे पदार्थ देत असत. त्यांच्या मुलांबरोबर त्यांचे मित्र देखील ते पदार्थ खात असत. सगळं सुरळीत चालू असताना त्यांच्या पतीची नोकरी गेली. घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसकसा धकवायचा हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी न डगमगता घरच्या घरी लाडू, चकली, चिवडा हे पदार्थ तयार करून विकण्यास सुरुवात केली. 

या सर्व पदार्थाना घरची चव असल्यामुळे थोड्याच दिवसात हे पदार्थ लोकप्रिय झाले. गीता पाटील ह्या पाटील काकू म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या पदार्थाला पुण्याहून मागणी येऊ लागली आणि अश्या प्रकारे त्यांच्या या व्यवसायाला प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे त्यांचा मुलगा विनीत याच्यामुळे त्याने पाटीलकाकू.कॉम हि वेबसाईट बनवली यामुळे ऑनलाईन ऑर्डर घेण्यास सुरुवात झाली. 

त्यामुळे व्यवसायाला जोरदार गती मिळाली. त्यांनी सांताक्रूझ येथे जागा घेऊन व्यवसाय सुरु केला आणि आता आज त्यांच्या हाताखाली काम करून बायका आपला संसार सुरळीतपणे चालवत आहे. आज त्यांची वार्षिक उलाढाल १.५ कोटी एवढी आहे. आनंद महिंद्रा यांनी देखील त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.