Home » सरकारला घाम फोडणारे व मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे मनोज जरांगे पाटील नेमके आहेत तरी कोण…!
News

सरकारला घाम फोडणारे व मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे मनोज जरांगे पाटील नेमके आहेत तरी कोण…!

मागील चार वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे आता पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे जालन्याच्या अंबड तालुक्यातील सराटी आंतरवाली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण. न्यायालयात मराठा आरक्षणाचा लढा सुरु असला तरी देखील सरकारने मराठा समाजातील मुलांची परिस्थिती समजून घ्यावी व त्यांना न्याय द्यावा आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.

या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यांच्या या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल घेतली परंतु ठोस निर्णय न घेळक्यामुळे त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं आहे. हे आंदोलन शांततेत चालू असताना देखील पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये आंदोलक वृद्ध, महिला आणि विध्यार्थी जखमी झाले.

या घटनामुळे मनोज जरांगे हे महाराष्ट्रभर चर्चेत आले आहे. मनोज जरांगे यांची नेमकी ओळख काय? मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी योगदान कास दिल. मनोज जरांगे नेमके आहे तरी कोण त्याबद्दल जाणून घेऊया. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे हे गेल्या १० ते १५ वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज जरांगे हे मूळचे बीडमधील मातोरी या गावचे आहेत. पण काही वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे स्थायिक झाले. 

जरांगे पाटील यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. पण त्यांना असणारी समाजसेवेची आवड त्यांना काही स्वस्थ बसू देत नाही. त्यांनी स्वतःची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला बाळ देल आहे. यासाठी त्यांनी अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषणे देखील केलीत, रास्ता रोको आंदोलन देखील केले. 

अनेकदा त्यांनी शेतमजुरी, हॉटेलमध्ये काम करून मराठा आंदोलनाची चळवळ चालूच ठेवली. त्यामुळे मराठा समाजासाठी लढणारा लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख झाली आहे. मराठा समाजाच्या चळवळीसाठी काम करताना देखील त्यांनी कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष नाही केलं. 

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मृ’त पावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला मनोज जरंगे पाटील यांनी गौरीगंधारी आंदोलनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे ते मराठा आंदोलनातील ते मुख्य चेहरा बनले. मनोज जरांगे यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयावर देखील मोर्चा काढला होता. तेव्हा ते पूर्ण महराष्ट्रात चर्चेत आले होते आणि आता जालन्यातील सरती आंतरवाली येथील आंदोलनामुळे पुन्हा जोरदार चर्चेत आहे.  

सुरुवातीला मनोज जरांगे हे काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते. परंतु नंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवबा संघटनेची स्थापना केली. त्यांनी अगदी आक्रमकपणे संघटनेच्या कामाला सुरुवात केली.२०२१ मध्ये त्यांनी जालन्यातील साष्ट पिंपळगाव येथे देखील आंदोलन केले होते. जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.