Home » आर्यन खान सोबत अटक केलेले अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आहे तरी कोण…
Celebrities

आर्यन खान सोबत अटक केलेले अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आहे तरी कोण…

शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन याला शनिवारी एनसीबीने एका लक्झरी क्रूझ लाइनरमध्ये चाललेल्या रेव्ह पार्टीचा भंडाफोड केल्यानंतर अटक केली. आर्यनसोबत त्याचा चांगला मित्र अरबाज मर्चंटलाही या पार्टीत अटक करण्यात आली होती.माहितीनुसार ड्रग्स प्रकरणात आर्यन पेक्षाही अरबाज मर्चंटच कनेक्शन आणि नाव जास्त आहे.

क्रूझवरील ड्र’ग्ज’च्या छाप्यात अडकलेल्या सर्व लोकांपैकी सर्वांचे लक्ष आर्यन खानवर आहे.कारण आर्यन मेगास्टार शाहरुख खानचा मुलगा आहे.आर्यन हा २३ वर्षांचा आहे.आर्यनने दक्षिणी कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.२०१९ च्या ‘द लायन किंग’ मध्ये आर्यनने ‘सिम्बा’ या मुख्य पात्राचा आवाज हिंदीमध्ये डब केला होता.आर्यनशी प्रत्येकजण परिचित आहे, पण अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा त्याच्यासोबत कोण आहेत हे फार लोकांना माहिती नाही.हे दोघे आहे तरी कोण हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल…

कोण आहे आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट…

अरबाज मर्चंट शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि सुहाना खानचा जवळचा मित्र आहे.अरबाज मर्चंट चा ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंध आहे.अरबाजच्या सोशल मीडियावर चाहत्यांची मोठी यादी आहे.जरी त्याने त्याचे सोशल मीडिया खाते खाजगी केले असले तरी.त्याचे सोशल मीडियावर ३९ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.अरबाज हा नेहमी ड्र’ग्स पार्टी मध्ये जातो.त्याच्या मोबाईल चॅट वरून ड्र’ग्स कनेक्शन आहे ही माहिती समोर आली आहे.अरबाज हा आर्यन खान बरोबर सूहाना खानचा देखील जवळचा मित्र आहे.

जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर,अरबाज हा पेशाने अभिनेता आहे आणि सुहाना खान आणि आर्यन खानसोबत पार्टी करतानाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.याशिवाय बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सची मुले अरबाजला फॉलो करतात.ज्यात इरफानचा मुलगा बबील, पूजा बेदीची मुलगी आलिया यांचाही समावेश आहे.

अनन्या पांडे हिच्यासोबत ही चांगली मैत्री…अनन्या पांडेसोबत पार्टी करताना…

आर्यन आणि सुहाना व्यतिरिक्त,अरबाज मर्चंट चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेच्या अगदी जवळ आहे आणि तो अनेकदा तिच्यासोबत पार्टी करताना दिसतो.काही वर्षांपूर्वी अरबाज मर्चंटचे नाव पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरसोबतही जोडले गेले होते. जिथे हे दोघे काही काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी आली होती.

मूनमून धमेचा कोण आहे…

मूनमून धमेचा ही एक मॉडेल आहे रिपोर्टर च्या माहितीनुसार ती मध्यप्रदेश मधील बिझनेस मॅन ची मुलगी आहे.मूनमून धमेचा ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.

एनसीबी ला मिळाली गुप्त माहिती…

एनसीबी ने छापा टाकला.अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर रेव्ह पार्टीच्या संदर्भात प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर अटक केली.आर्यन व्यतिरिक्त,मुनमुन धामेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांनाही अटक करण्यात आली आहे.अटकेनंतर रविवारी तिघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली.त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाईल,असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.