Home » फक्त ३० दिवस सोयाबीनच्या नियमित सेवनामुळे होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे…!
News

फक्त ३० दिवस सोयाबीनच्या नियमित सेवनामुळे होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे…!

सोयाबीन हे संपूर्ण वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ बनले आहे. सोयाबीन पासून निरनिराळ्या पदार्थांची निर्मिती केली जाते. सोयाबीनच्या इतक्या वाढत्या लोकप्रियतेमागचे कारण आपल्या शरीराला होणारे अनेक फायदा होय. सोयाबीन हे मुख्यत्वे पूर्व आशियामध्ये उत्पादन केले जाते.मात्र भारतामध्ये सुद्धा सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळते. सोयाबीन मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंट प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. जे लोक संपूर्णपणे शाकाहरी असतात ते मांसाहारा ऐवजी सोयाबीन मोठ्या प्रमाणावर वापरून आपली प्रथिनांची गरज भागवताना दिसतात.

सोयाबीनच्या आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्यांमुळे टोफू,सोया मिल्क अशा विविध स्वरूपामध्ये संपूर्ण जगभरातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनची उत्पादने विकली जात आहेत.यामुळे वेगान मानल्या जाणाऱ्या लोकसंख्येसाठी एक नवीनच पर्याय उपलब्ध झालेला आहे. सोयाबीन हे पुरुषांप्रमाणेच विशेष करून स्त्रियांसाठी खूपच आरोग्यदायी पर्याय ठरतो. आजच्या काळामध्ये स्त्रियांना होणारे ऑस्टियोपोरोसिस, मूड स्विंग ,हार्मोनल बदल या सर्वांसाठी यांचे नियमित सेवन करणे खूपच प्रभावी ठरते .आज  आपण या लेखामध्ये सोयाबीनच्या नियमित सेवनामुळे आपल्या शरीराला मिळणारे फायदे जाणून घेणार आहोत.

1) सोयाबीन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि कर्बोदके सुद्धा असतात. उकडलेल्या सोयाबीन मध्ये खूप नाममात्र स्वरूपात केलरी असतात‌.मात्र या मधून मिळणारी प्रथिने ,कर्बोदके मात्र मुबलक असतात .भारतीय आहार संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून सोयाबीनचा समावेश केला जातो. सोयाबीनमध्ये अमिनो ऍसिड आणि एंटीआक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असतात.

2) सोयाबीन मध्ये मॅग्नेशियमची मात्रा मुबलक प्रमाणात असते. शरीरावर निर्माण होणारा अतिरिक्त तणाव नाहिसा करणे आणि अस्वस्थता,निद्रानाश यांसारख्या समस्यांवर खूपच प्रभावी ठरते. यासाठीच सोयाबीन चे नियमित सेवन केले असता तणाव, निद्रानाश यासारख्या समस्या निर्माण होत नाही व रात्री शांत झोप लागते.

3) सोयाबीनचे सेवन ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी केले तरीही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.सोयाबीन मध्ये कर्बोदके हे योग्य त्या प्रमाणात असल्यामुळे मधुमेही व्यक्ती याचे सेवन करू शकतात.रक्तातील व शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्याचे गुणधर्म सोयाबीन मध्ये असतात असे सांगितले जाते.

4) सोयाबीन मध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक अस्तित्वात असतात. लोह आणि कॉपर हे दोन घटक शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीस चालना देतात. लाल रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण झाला तर शरीरातील विशेषतः रक्ताभिसरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते यासाठी सोयाबीनचे नियमित सेवन करावे जेणेकरून लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठीही चालना मिळेल.

5) स्त्रियांनी पोषक आहार घेणे हे गर्भातील बाळासाठी स्त्रीसाठी दोघांसाठीही खूपच आवश्यक असते. पोषक आहार घेतला नाही तर त्याचा प्रत्यक्ष प्रभाव हा बाळाच्या वाढ आणि विकासावर पडतो .यासाठी सर्व पोषक घटकांनी युक्त आहाराचे सेवन गर्भवती स्त्रीने करावे. गर्भावस्थेमध्ये फॉलिक ऍसिड खूप आवश्यक असते. सोयाबीनमध्ये फॉलिक ऍसिड मुबलक प्रमाणामध्ये असते म्हणून गर्भावस्थेमध्ये गर्भवती स्त्रीने फॉलिक ऍसिड स्त्रोत म्हणून सोयाबीनचे सेवन अवश्य करावे.

6) साधारण चाळीशीनंतर हाडांची झीज योग्य आहार आणि व्यायाम अभावी सुरू होऊ शकते म्हणूनच कॅल्शियम ,सेलेनियम, मॅग्नेशियम घटकांनी युक्त सोयाबीनचे सेवन हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी अवश्य करावे असे सांगितले जाते. आस्टिओपोरिसिससारख्या समस्यांवर आणि हाडांच्या एकंदरीतच आरोग्यासाठी सोयाबीन खूप प्रभावीपणे कार्य करते.

7) सोयाबीन मध्ये अस्तित्वात असलेल्या फायबर मुळे बद्धकोष्ठतेचा त्रास व अपचनापासून मुक्तता मिळते.सोयाबीनच्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश केल्यास अगदी सहजपणे व नियमितपणे पोट साफ होते. पोट साफ न होणे ही एक खूपच त्रासदायक समस्या आहे. सोयाबीनमध्ये असलेल्या डायटरी फायबरमुळे कोणत्याही वेदनेशिवाय शौचास साफ होते.

8) सोयाबीन ला संपूर्ण जगामध्ये जी वाढती मागणी आहे त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे सोयाबीन मुळे वजन नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होते .सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात त्यामुळे चयापचयाची प्रक्रिया जलद गतीने होते. पोट भरल्याची भावना निर्माण होते जेणेकरून वेळोवेळी खाण्यास आळा बसतो. परिणामस्वरूप जंक फूड किंवा गरजेपेक्षा जास्त खाण्यासाठी बचाव होतो .सोयाबीन मध्ये अस्तित्वात असलेल्या प्रथिनांमुळे स्नायूंच्या वाढीस चालना मिळते.