Home » मुस्लिम धर्मामध्ये हलाल मटणला एवढे महत्व का दिले जाते, जाणुन घ्या हलाल आणि झटका यामधील फरक…!
Infomatic

मुस्लिम धर्मामध्ये हलाल मटणला एवढे महत्व का दिले जाते, जाणुन घ्या हलाल आणि झटका यामधील फरक…!

मांसाहार करणे हे सध्या अतिशय सर्वसाधारण गोष्ट झाली आहे.विविध जाती धर्मातील स्तरांमधील लोक हे मांसाहार करताना दिसून येतात.मांसाहार मध्ये हलाल आणि झटका हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात.हलाल आणि झटका म्हणजे नेमके काय हे आपण जाणून घेणार आहोत.हलाल व झटका या दोन्ही प्रकारच्या मांसामध्ये एखाद्या धारदार शस्त्राने प्राण्यांची मान कापली जाते व या दोन्ही मधून आपल्याला मांस मिळते मात्र यामध्ये असलेले फरक धार्मिक बाबीशी निगडित आहे.

हलाल प्रकारचे मांस मुस्लिम धर्मीय प्रामुख्याने खातात.बोकडाचे मटण करण्यापूर्वी त्याच्यासमोर कलमा वाचून तीन वेळा मानेवर सुरी फिरवली जाते.अशा प्रकारे हलाल केलेले मटण मुस्लिम धर्मामध्ये खाल्ले जाते.अन्य प्रकारचे मटन खाण्यास इस्लाम मध्ये प्रतिबंध केला जातो.हिंदू आणि शीख धर्म हे या मुख्यत्वे झटका प्रकारचे मांस खातात.हलाल नियमांच्या मते ज्यावेळी प्राण्यांची मान कापली जाते तेव्हा तेव्हा तो प्राणी शुद्धीत असला पाहिजे तसेच एका प्राण्याला हलाल केले जात असते तेव्हा त्याच्यासमोर दुसरा प्राणी आणला जात नाही.

एक प्राणी हलाल केल्यानंतरच दुसऱ्याला तिथे हलाल करण्यासाठी आणले जाते.हलाल करण्याच्या पद्धतीमध्ये एका विशिष्ट नसेवर तीक्ष्ण हत्याराने तीन वेळा वार केले जातात व यामुळे हळूहळू या प्राण्यांचा जीव जातो.या प्रक्रियेमध्ये त्याला प्रचंड वेदना होतात.हलाल केल्यामुळे शरीरातील सर्व रक्त निघून जाते व यामुळे हे मांस खाण्यासाठी पवित्र असते असे मानले जाते.या प्राण्यांचा जीव जात असताना त्याच्यासाठी धार्मिक उच्चारण केले जाते.

झटका म्हणजे यामध्ये प्राण्याला विजेचा झटका देऊन किंवा एखाद्या तीक्ष्ण हत्याराने एकच वार करून मारले जाते.यामुळे या प्राण्याला वेदनादायी मरण येत नाही व एका झटक्यात त्याचा मृ’त्यू होतो.या प्रक्रियेमध्ये शरीरातील सर्व रक्त वाहून जात नाही. झटका मटन हा प्रकार प्राण्यांच्या या यातना कमी करण्याच्या दृष्टीने केला जातो.हलाल करण्याच्या पद्धती मागे काही आरोग्याच्या दृष्टीने ही कारणे आहेत.मांसाहार हा प्रामुख्याने प्रथिनांचा स्रोत म्हणून केला जातो व कोणत्याही प्राण्याच्या रक्तामध्ये मुख्यत्वे जीवजंतू असतात.त्यामुळे हलाल या पद्धतीने हळूहळू शरीरातील सर्व रक्त निघून जाते त्यावेळी राहिलेले मांस हे पोषक व निरोगी मानले जाते.