Home » तुम्हाला माहित आहे का,गॅरंटी आणि वॉरंटी यामध्ये नेमका काय फरक आहे? माहित नसेल तर नक्की जाणून घ्या… 
Infomatic

तुम्हाला माहित आहे का,गॅरंटी आणि वॉरंटी यामध्ये नेमका काय फरक आहे? माहित नसेल तर नक्की जाणून घ्या… 

आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण त्या दुकानदाराच्या तोंडातून दोन शब्द नक्की ऐकतो ते म्हणजे वारंटी आणि गॅरंटी आणि आपण पण नेहमी वस्तूची वारंटी आणि गॅरंटी याची विचारपूस करूनच वस्तू खरेदी करतो.बऱ्याच लोकांना गॅरंटी आणि वॉरंटी मधील फरक माहित नाही.काही लोक त्यांना समानार्थी शब्द म्हणून देखील ओळखतात.पण हे खरे नाही आणि हे दोन शब्द एकमेकांपासून खूप वेगळे आहेत.

या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे ग्राहकाला गॅरंटी/वॉरंटीचा लाभ घेण्यासाठी निश्चित बिल किंवा गॅरंटी/वॉरंटी कार्ड असणे आवश्यक आहे.ही आवश्यक कागदपत्रे ठेवल्यानंतरही,जर एखाद्या दुकानदाराने वस्तू बदलण्यास नकार दिला किंवा तो दुरुस्त करण्यास नकार दिला तर ग्राहक ग्राहक न्यायालयात जाऊ तक्रार करू शकतो.

आज आम्ही सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी गॅरंटी आणि वॉरंटी यांच्यामध्ये काय फरक असतो ते सांगणार आहोत.

१) वॉरंटी म्हणजे काय : जर एखाद्या वस्तूवर वारंटी दिली असेल तर ती वस्तू खराब होण्याच्या अगोदर वारंटीवर दिलेल्या फिक्स टाईम पिरेड मध्ये आपण ती वस्तू बदलून घेऊ शकतो.यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे वस्तू बदलून मिळत नाही जर तुमची वस्तू खराब झाली तर दुरुस्त करून मिळते.

वारंटीला आपण जास्त पैसे देऊन वारंटी पिरेड वाढून घेऊ शकतो आणि सहसा वारंटी पिरेड हा गॅरंटी पिरेड पेक्षा जास्त असतो.कारण यामध्ये सेलरला वस्तू खराब झाल्यावर फक्त दुरुस्त करून द्यावी लागते बदलून नाही.

उदाहरण : जर आपण एखादा फॅन विकत घेतला असेल आणि त्या विक्रेत्याने जर सांगितले ह्या फॅन ची एका वर्षाची वारंटी आहे म्हणजे एका वर्षात जर फॅन ला काही झाले तर आपण तो फॅन दुरुस्त करून देण्याची त्या कंपनीची जबाबदारी असते.

वॉरंटी मिळवण्यासाठी खालील अटी असतात :

१) पहिली अट म्हणजे ग्राहकाकडे एकतर खरेदी केलेल्या वस्तूचे बिल पाहिजे.

२) दुसरी अट म्हणजे विकत घेतलेल्या वस्तूचे वारंटी कार्ड पाहिजे.

२) गॅरंटी हमी काय आहे : गॅरंटी मध्ये घेतलेली वस्तू जर खराब झाली तर आवश्यकता असल्यास ती वस्तू आपल्याला बदलून मिळते.कारण विक्रेत्याला जर वाटले की ही वस्तू दुरुस्त होऊ शकत नाही वस्तू मध्ये खुप मोठा प्रॉब्लेम आहे तर गॅरंटी पिरेड मध्ये असणारी वस्तू बदलून देऊ शकतो.

यामुळे वारंटी पिरेड पेक्षा कंपनी गॅरंटी पिरेड कमी देते.वारंटी पिरेड प्रमाणे गॅरंटी पिरेड ची व्हॅलिडीटी जर संपत आली तर ती आपल्याला वाढवता येऊ शकत नाही.

उदाहरण : जर आपण एखादी वस्तू खरेदी केली त्या वस्तूची आपल्याला पाच वर्षे गॅरंटी दिली आणि पाच वर्षामध्ये त्या वस्तूला काही जरी झाले तर ती वस्तू बदलून देण्याची जबाबदारी असते.

गॅरंटी मिळवण्यासाठी खालील दोन अटी असतात :

१) ग्राहकाकडे एकतर खरेदी केलेल्या वस्तूचे गॅरंटी कार्ड पाहिजे.

२) खराब झालेली वस्तू सेलरकडे नेली पाहिजे जेणेकरून आपल्याला गॅरंटीचा फायदा घेता येईल.