Home » दिग्गज नेत्यांची झोप उडवणारं ‘ईडी’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला तर मंग जाणून घेऊया…!
Infomatic

दिग्गज नेत्यांची झोप उडवणारं ‘ईडी’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला तर मंग जाणून घेऊया…!

आपण अनेकदा पेपरमध्ये वाचतो अमुक व्यक्तीला ईडीच्या नोटीस मिळाली किंवा अमुक व्यक्तीच्या घरावर ईडीची छापेमारी. आपण नुसतं वाचतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का?  ईडी म्हणजे नेमकं काय? चला तर मंग जाणून घेऊया. ईडी म्हणजे इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजेच मराठीत प्रवर्तन संचलनालय आणि हिंदीमध्ये प्रवर्तन निदेशालय असे होय. ईडीची स्थापना  १ मे १९५६ साली दिल्ली येथे झाली. 

आर्थिक घोटाळे किंवा पैशाचा गैरव्यवहार शोधून काढण्याचं काम ईडी संस्थेचं आहे. देशातील आर्थिक गुन्ह्यांचा शोध लावण्याचा अधिकार ईडीलाचं असतो. भारतातील काळ्या पैशाचा शोध लावण्याचा आणि घोटाळेबाजांची चौकशी करण्याचा अधिकार हा ईडीलाच असतो. त्यामुळे घोटाळेबाज हे नेहमी ईडीपासून सावधचं राहतात.

केंद्रसरकार मधील महशूल विभाग आणि अर्थ मंत्रालय यांच्या अंतर्गत ईडीचे कामकाज चालू असते. कायद्याचे उल्लंघन होत असेल तर त्या प्रकरणामध्ये ईडीद्वारे तपास केला जातो. ईडीला अटक करणे, तपास करणे, खटला दाखल करणे, मालमत्ता जप्त करणे हे पूर्ण अधिकार दिलेले असतात.