Home » ‘सळो की पळो करून सोडणारे’ नवाब मलिक यांना ‘या’ कारणामुळे झाली अटक…!
News

‘सळो की पळो करून सोडणारे’ नवाब मलिक यांना ‘या’ कारणामुळे झाली अटक…!

आपल्या बंडखोर आणि नीडर खाक्यामुळे प्रसिद्ध असलेले नवाब मलिक यांना इडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केले आहे.गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे नवाब मलिक सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.ईडीच्या चौकशीचा ससेमिरा नवाब मलिकांच्या मागे का लागला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईत कुर्ल्यात असलेला एक भूखंड नवाब मलिक यांनी टाडाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपींकडून कमी दरामध्ये खरेदी केल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी  केला होता व या आरोपाच्या संदर्भातच अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आज भल्या पहाटे नवाब मलिक यांच्या घरी ईडीने धाड टाकली व त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशी पश्चात त्यांना अटक करण्यात आले आहे.दाऊद इब्राहिमच्या पैशांच्या घोटाळ्यांमध्ये सुदधा नवाब मलिक यांचे नाव अडकलेले आहे.नवाब मलिक यांनी कुर्ल्यामध्ये जी तीन एकर जमीन खरेदी केली आहे तीच जमीन पूर्वी ज्या व्यक्तींच्या नावे होती ते मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये टाडाचे आरोपी होते असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.तसेच या लोकांच्या जमिनी सरकारी जमिनी म्हणून नोंद होऊ नये यासाठी नवाब मलिक यांनी कमी दरामध्ये खरेदी केल्याचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी  केले होते.

नवाब मलिक यांचे नाव अंडरवर्ल्डशी संबंध असण्याबद्दल भात याअगोदर अनेकदा आले आहे.1993च्या बॉम्ब स्फोटात आरोपी असलेल्या सरदार या आरोपीच्या नवाब मलिक संपर्कात होते.तसेच सलीम पटेल या दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गुंडांसोबतही नवाब मलिक यांचे संबंध होते असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले.सलीम पटेल हा दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता व हसीनाच्या अनेक मालमत्तांना सलीम  पॉवर र्ऑफ एटर्नी होता.

इक्बाल कासकर या अंडरवर्ल्ड मधील मनी लॉड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराने अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या राजकीय व्यक्ती मध्ये नवाब मलिक यांचे नाव घेतले व तेव्हापासून नवाब मलिक ईडीच्या चौकशीच्या रडारवर होते.ईडीने ताब्यात घेतल्या नंतर आपण झुकणार नसल्याचे भाष्य नवाब मलिक यांनी केले आहे.या कारवाईचे पडसाद संपूर्ण राज्यभर पडल्याचे दिवसभरात दिसून आले आहे.