Home » ‘RRR’ चित्रपटातील ‘शोले’ या गाण्यात दिसली छत्रपती शिवाजी महाराज यांची झलक…!
News

‘RRR’ चित्रपटातील ‘शोले’ या गाण्यात दिसली छत्रपती शिवाजी महाराज यांची झलक…!

दाक्षिणात्य चित्रपट सध्या खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात पाहिले जात आहेत व त्यांची लोकप्रियताही वाढत आहे.पुष्पा या चित्रपटा पाठोपाठ ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण या दोन सुपरस्टार्सची भूमिका असलेल्या आर आर आर या चित्रपटाची ही सध्या खूपच चर्चा चालू आहे .हा चित्रपट बिग बजेट तर आहेच मात्र या चित्रपटाची स्टारकास्ट सुद्धा चांगली आहे.

या चित्रपटामध्ये साउथ आणिबॉलिवूड यांची जोडी जमली आहे.या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट हे सुमारे 450 कोटी आहे.या बाबींमुळे हा चित्रपट बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असा बनला आहे.या चित्रपटातील काही गाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.

यापैकी एका गाण्यांमध्ये महापुरुषांचा उल्लेख असल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे व या महान पुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना हे स्टार्स दिसून येत आहेत.यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन एस राजामौली यांनी केले असून हा चित्रपट आलिया भट चा दाक्षिणात्य चित्रपटा पैकी पहिलाच चित्रपट आहे.