Home » झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टमधील नोकरी! वाचा शाहिनाचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास…!
Success

झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टमधील नोकरी! वाचा शाहिनाचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास…!

धारावीची झोपडपट्टी ही प्रतिकूल परिस्थितीचे जणू काही द्योतक आहे.मात्र या परिस्थितीतही जिद्दीने उच्च पदावर गेलेल्या व्यक्ती निश्चितच भावी पिढीसाठी आदर्श आहेत. शाहिना अत्तारवाला ह्या धारावीच्या झोपडपट्टीमध्ये बालपण गेलेल्या व सध्या मायक्रोसॉफ्ट मध्ये प्रॉडक्ट डिझाईन मॅनेजर म्हणून काम करणा-रा धडाडीच्या महिला आहेत.

शाहिना आत्तारवाला या धारावीच्या झोपडपट्टीमध्ये कुर्ला परिसरित दर्गाजवळ वाढल्या. त्यांचे वडिल या ठिकाणी अत्तर विक्रीचा व्यवसाय करत असत. त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. शाहिना सांगतात की परिस्थितीने व आजुबाजूच्या दारिद्र्य, निरक्षरता, लैंगिक विषमतेचे तिला शिक्षण व आर्थिक स्वातंत्र्य यांविषयी जागरूक बनवले.

शाळेत असताना शाहिनाने सर्वात प्रथम संगणक पाहिला व तिला कुतुहल निर्माण झाले.तिने त्याचवेळी आपल्याला भविष्यात संगणक क्षेत्रात काम करायचे निश्चितच केले. वडिलांनी हालाखीच्या परिस्थिती मध्ये शाहिनाला संगणक कोर्सला प्रवेश घेतला. हा कोर्स करताना शाहिनाने भरपूर संघर्ष केला मात्र कच खाल्ली नाही.

प्रोडक्ट डिझाईन मॅनेजर पदावर काम करणाऱ्या शाहिना आत्तारवाला यांनी अथक परिश्रमाने काही वर्षांपूर्वी एका चांगल्या उच्चभ्रू वसाहतीत सदनिका घेतली आहे. याठिकाणी राहत असताना भूतकाळातील धारावीच्या अनुभवांचा विसर आजही वाहिन्या यांना पडलेला नाही.