Home » नाभीमध्ये तेल जिरवल्यामुळे होतात हे आश्चर्यकारक फायदे
News

नाभीमध्ये तेल जिरवल्यामुळे होतात हे आश्चर्यकारक फायदे

आपल्या शरीरातील निरनिराळ्या अवयवांची काळजी घेणे हे परिपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे ठरते.आपल्या शरीरातील काही विशिष्ट अवयव हे अन्य अवयवांवर सुद्धा सकारात्मक असा प्रभाव टाकतात.त्यामुळे या विशिष्ट अवयवांची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर आपल्याला निश्चितच निरोगी राहण्यास साहाय्य मिळते .आपल्या शरीराचा केंद्रबिंदू मांडले जाणारे बेंबी किंवा नाभी शी निगडीत काही उपाय केलेले असता आपल्या शरीरातील अन्य अवयवांशी निगडित आरोग्यविषयक समस्यांना दूर ठेवणे शक्य होते.

1) नाभी ही शरीरातील निरनिराळ्या बिंदूंशी व नसांशी जोडली गेलेली असते. यामुळे फार पूर्वी पासून आपल्या शरीराला तेलाने मालिश करण्याचा जो उपाय आहे तो नभीमध्ये तेल जिरवून अनेक प्रकारच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो.हा  उपाय करण्यासाठी आपण नारळाचे ,तिळाचे किंवा ऑलिव ऑइल सुद्धा वापरू शकतो.
2) प्राचीन काळापासून नाभी मध्ये तेल जिरण्याच्या या पद्धतीला पेचोटी असे म्हटले जाते .पेचोटी पद्धतीचा अवलंब यासाठी केला जातो की नाभी द्वारे विशिष्ट प्रकारची तेलं आणि सुगंध घेऊन शरीरातील निरनिराळ्या अवयवांना याचे फायदे पुरवले जाऊ शकतात व संप्रेरकाच्या कार्यालाही कार्यान्वित केले जाऊ शकते. 

3) शरीरातील अन्य अवयवांची स्वच्छता राखली जात असताना नाभी कडे काहीसे दुर्लक्ष केले जाते .मात्र नाभी मध्ये तेल घेऊन त्याद्वारे नाभीची योग्य ती स्वच्छता केली जाऊ शकते .नाभीची स्वच्छता केल्यामुळे जंतूंचा संसर्ग होण्यापासून बचाव होतो तसेच पोटाचे आरोग्यही चांगले राखणे शक्य होते.
4) जर तुम्हांला त्वचेला तजेलदार आणि नितळ बनवायचे असेल तर आपल्या नाभीला तेलाने मसाज करणे हा अतिशय उत्तम उपाय ठरतो. नाभीला तेलाने मालिश केल्यामुळे आपल्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील डाग, मुरूम इत्यादी पासून सुटका मिळते. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी काही औषधी तेले उदाहरणार्थ लिंबाचे तेल आपण नाभीमध्ये मालिश करण्यासाठी वापरू शकतो त्याचे अधिक चांगले परिणाम त्वचेवर दिसून येतात.

5) आपण आपल्या नाभीची स्वच्छता राखत नसाल तर काही नित्याच्या जंतूसंसर्ग चा प्रभाव आपल्यावर अगदी सहजपणे घडून आपल्याला त्या आजारांचे संक्रमण होऊ शकते. नाभीची स्वच्छता राखणे हे आपल्या आंतरिक आणि बाह्य आरोग्यासाठी खूपच आवश्यक असते. कफ, सर्दी, खोकला इत्यादी दैनंदिन तत्त्वावर होणाऱ्या संसर्गापासून वाचण्यासाठी आपल्या नाभीमध्ये तेल सोडून व्यवस्थित मालिश करावी.
6) आपल्याला जर पचनाशी निगडित काही समस्या सतावत असेल जसे की पोट फुगल्यासारखे वाटणे,मळमळ होणे किंवा अपचन झाल्यासारखे वाटणे यांसारख्या समस्यांवर अतिशय चांगला उपाय म्हणजे मोहरीचे तेल आणि आल्याचा रस एकत्र करून हे मिश्रण आपल्या नाभीमध्ये व्यवस्थितपणे लावावे यामुळे पचन व्यवस्थित होते.

7) पाळीच्या काळामध्ये पोटामध्ये होणाऱ्या वेदनांवर उपाय म्हणून आपल्या नाभीमध्ये तेल सोडून व्यवस्थितपणे मालिश केली असता केवळ वेदनांपासून मुक्तता मिळत नाही तर संपूर्ण शरीराला ऊर्जा प्राप्त होते.
8) नाभी ही आई आणि गर्भ यांच्यामधील एक दुवा मानले जाते नाभीला तेलाने मालिश केल्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये ही प्रजननक्षमता वाढल्याचे काही सर्वेक्षणांमध्ये आढळून आले आहे. नाभीला मालिश केल्यामुळे पुरुषांमधील स्पर्म काउण्टही वाढतो.

10) आयुर्वेदद्वारे शरीरातील ऊर्जा  जागृत केली जाते.आपल्या शरीरातील ऊर्जा ही नाभीमध्ये केंद्रित झालेली असते व या नाभी द्वारे शरीराला ऊर्जा पुरवली जाते म्हणूनच नाभीची निगा राखली असता आपल्या शरीरातील ऊर्जेशी निगडीत चक्र सक्रीय होतात.
11) डोळ्यांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी आणि डोळ्यांखाली निर्माण होणाऱ्या डार्क सर्कल व सूज येण्यासारख्या समस्यांवर उपाय म्हणून नाभीमध्ये मोहरीचे तेल लावून मालिश करावी यामुळे आपल्याला दृष्टी तल्लख बनण्यासारखे फायदे होतात.

12) जसजसे वय वाढते तसे सांधेदुखी आणि शरीरातील अन्य हाडांचे दुखणे मागे लागते. हाडांचे दुखण्यांवर व सांधेदुखीवर अनेक प्रकारचे वैद्यकीय उपचार केले जातात व यांच्या जोडीलाच आपण नाभीमध्ये एरंडेल तेलाने मालिश केली असता काही प्रमाणात आराम पडल्याचे दिसून येते.
13) नाभीला तेलाने मालिश केल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे असले तरीही नाभीला योग्य प्रमाणातच मालिश करावे व आपल्या नाभीवर अतिरिक्त ताण देऊ नये कारण ह्या अवयवाशी आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या वाहिन्या जोडलेल्या असतात व अतिरिक्त ताणामुळे या अवयवांच्या कार्यावर आणि विशेषतः आतड्याच्या कार्यावर ही प्रभाव पडू शकतो. काही व्यक्तींना विशिष्ट प्रकारच्या तेलांची अलर्जी असते त्यामुळे हा उपाय करण्याअगोदर टेस्ट नक्की करावी.जर नाभीमध्ये तेलाने मालिश केल्यावर खाज सुटणे किंवा जळजळ होणे यांसारखी लक्षणे दिसली तर हा उपाय करणे थांबवावे.

14) नाभीला तेलाने मालिश करण्याअगोदर आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावेत किंवा त्यांना सँनिटाईझ करून घ्यावे जेणेकरून ही मालिश करताना आपल्या अस्वच्छ हातांवरील जंतू नाभी द्वारे शरीरामध्ये प्रवेश करू नयेत.नाभीला मालिश करताना व्यवस्थित आरामशीर पद्धतीने बसून किंवा झोपून मग मालिश करावे.
15) नाभीला मालिश करण्यासाठी वापरले जाणारे तेल अति थंड किंवा अति गरम असू नये