Home » मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण मागे…!
News

मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण मागे…!

राज्यसभेचे खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारने त्यांच्या मराठा समाजासाठी च्या मागण्यांसंदर्भात आश्वासन दिल्यानंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे.आज त्यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस होता.

मराठा समाजाचे आरक्षण व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारी मुंबई येथील आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.यामध्ये त्यांच्या पत्नीने ही त्यांना साथ दिली आहे.आझाद मैदानावर छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक आंदोलकांनी राज्यभरातून येऊन आमरण उपोषण सुरू केले होते.

या आंदोलन संदर्भात छत्रपती संभाजी राजे यांनी असे म्हटले होते की मी सुरु केलेल्या आमरण उपोषणा मध्ये सहभागी झालेले आंदोलक हे त्यांच्या स्वेच्छेने पुढे आलेले आहेत व कोणतेही सरकार मराठा समाजाला गृहीत धरू शकत नाही.मराठा समाजाच्या आरक्षणाचा द्वारे नोकरी मध्ये सहभागी झालेल्या नोकरदारांच्या नोकऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गेल्यि आहेत त्यांना पुन्हा एकदा भरती करून घेण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.