Home » कधीकाळी प्रभुदेवा सोबत लिव्ह-इनमध्ये राहणारी अभिनेत्री करत आहे विग्नेश शिवनला डेट; साखरपुडा झाल्याच्याही आहेत चर्चा!
Celebrities

कधीकाळी प्रभुदेवा सोबत लिव्ह-इनमध्ये राहणारी अभिनेत्री करत आहे विग्नेश शिवनला डेट; साखरपुडा झाल्याच्याही आहेत चर्चा!

चित्रपट सृष्टी कोणतीही असो चर्चा आणि त्यातून जोडणारी नवी नाती मोडणारी नाती किंवा केवळ दिसणारी नाती असे बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अभिनेता आणि अभिनेत्री किंवा चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे नवीन नाही.

प्रभुदेवा याला डान्स सिंगचा देव म्हणलं तरी वावगे ठरणार नाही. त्याच्या तरुणपणातील काळात तर, तरुणी त्याच्यावर फिदा व्हाव्यात इतक्या सहजपणे त्याने आपल्या नृत्यशैली ने सगळ्यांना घायाळ केले होते.

प्रभू देवा सोबत नात्यांच्या बाबतीत नेहमीच काहीतरी वेगळा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या संसारात आलेली कटुता, पत्नी सोबत घेतलेला घटस्फोट, आणि सध्या त्याच्या आयुष्यात डान्स साठी असणारी जागा या सगळ्यांनीच त्याच्या आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो.

एक अभिनेत्री अशी होती जी, प्रभुदेवाच्या प्रेमात इतकी वेडी झाली की, तिने आपला धर्म बदलून चक्क त्याच्या सोबत राहायला सुरुवात केली. असे करत असताना दोघेही विवाह बंधनात अडकले नव्हते. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असताना प्रभुदेवा देखील तिच्या प्रेमात वाहवत गेला, आणि याचाच परिणाम त्याच्या संसार मोडण्यावर झाला, असे आजही बोलले जाते.

ही अभिनेत्री म्हणजे आपल्या अदांनी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘नयनतारा’ होय! जगाचा विचार न करता घरच्यांचा नकाराला झुगारून तिने प्रभू देवा सोबत राहायचे ठरवले. ते इतके निश्चित केले की, तिने आपला धर्म बदलून केवळ त्याचे बनून राहायचे असे डोक्यात ठेवले.

कितीही काळ पुढे गेला तरी नात्याला नाव नसले की, हक्कावरून, अधिकारावरून, आपल्या मागे लागणाऱ्या नावावरून, अनेक कारणावरून भांडण होतात. आणि त्या नात्याला नाव नसल्याने, कोणीही मिटवायला समोर येत नाही. असेच काहीसे यांच्या नात्यात झाले आणि आज या अभिनेत्रीने विग्नेश शिवन बरोबर साखरपुडा केला.