Home » एकेकाळी माधुरी दीक्षित होती अनिल कपूरच्या प्रेमात वेडी परंतु ‘या’ कारणामुळे दिला लग्न करण्यास नकार…!
Celebrities

एकेकाळी माधुरी दीक्षित होती अनिल कपूरच्या प्रेमात वेडी परंतु ‘या’ कारणामुळे दिला लग्न करण्यास नकार…!

बॉलीवूड मधील अनेक जोड्या त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या आहेत. या जोड्यांना प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र पाहण्याची अनेकांची इच्छा असते. नव्वदच्या दशकामध्ये अशीच एक ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त असलेली अभिनेता व अभिनेत्री ची जोडी म्हणजे अनिल कपूर व माधुरी दीक्षित होय. अनिल कपूर व माधुरी दीक्षित हे प्रेक्षकांप्रमाणे निर्माता व दिग्दर्शकांची ही पहिली पसंत बनले होते.

या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तेजाब, बेटा या चित्रपटांना तर घवघवीत यश सुद्धा मिळाले आहे. या दोघांच्या ऑनस्क्रीन रोमांस ला पाहताना अनेकांना प्रत्यक्ष आयुष्यातही हे एकमेकांना डेट करत असल्याच्या शंका येत असे व तसे बोलले ही जात असे. त्यावेळी अनिल कपूर यांना माधुरी दीक्षित खूप आवडत असे व माधुरी दीक्षित तर अनिल कपूरच्या प्रेमातच होती.

मात्र हे दोघेजण एकमेकांसोबत विवाह करणार का याबाबत तर्क लावले जात होते. अशातच एका मुलाखतीमध्ये खुद्द माधुरीने आपण अनिल कपूर सोबत लग्न करण्यात इंटरेस्टेड नाही असे सांगितले व यासाठी तिने दिलेले कारण ऐकून सर्वजण प्रचंड अचंबित झाले. माधुरीला ज्यावेळी ती अनिल कपूर सोबत लग्न करू इच्छिते का असे विचारले गेले त्यावेळी तिने अगदी क्षणाचाही विलंब न करता नाही असे उत्तर दिले.

याला कारण देताना तिने असे म्हटले की अनिल कपूर खूपच हळवा आहे व इतक्या भावनाशील व हळव्या व्यक्तीसोबत मला विवाह करायचा नाही. अनिल कपूर च्या स्वभावाची एक वेगळी बाजू या उत्तरामुळे चहात्यांच्या समोर आली. अनिल कपूर ने सुनीता कपूर सोबत विवाह केला असून या दोघांना तीन मुले सुद्धा आहेत. तसेच माधुरीने ही अमेरिकास्थित डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला.