Home » अनेक वर्षानंतर करण जोहरने सांगितले ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटामागील गुपित, अनेकवेळा बघून देखील कोणालाच कळले नाही…!
Celebrities

अनेक वर्षानंतर करण जोहरने सांगितले ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटामागील गुपित, अनेकवेळा बघून देखील कोणालाच कळले नाही…!

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर ने बनवलेला कुछ कुछ होता है हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयावर आजही राज्य करून आहे.हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.आज सुद्धा या चित्रपटाची लोकप्रियता तितकीच आहे.या चित्रपटातील गाणी व संवाद सुद्धा चाहत्यांच्या ओठांवर आहेत.हा चित्रपट 1998 साली प्रदर्शित झाला.

पण आज सुद्धा तितक्याच आवडीने हा चित्रपट पाहिला जातो.या चित्रपटामध्ये काजोलने साकारलेले अंजली हे पात्र सुद्धा खूप लोकप्रिय झाले होते.या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेचे अनेक किस्से हे आज सुद्धा लोकांना आश्चर्य चकित करून सोडतात.

करण जोहरने नुकताच या चित्रपटाशी निगडित एका गोष्टीचा खुलासा केला आहे.द बिग पिक्चर या कार्यक्रमामध्ये करण जोहर ने या चित्रपटामध्ये काजोलने साकारलेल्या अंजली या पात्राला संपूर्ण चित्रपटातील कॉलेज लूकमध्ये हेअर बँड दाखवला आहे.हा हेअर बँड फॅशन स्टेटमेंट म्हणून दाखवण्यात आलेला नसून त्यामागे काहीतरी वेगळेच कारण असल्याचे त्याने सांगितले.

या चित्रपटामध्ये ज्यावेळी अंजलीला विशिष्ट हेअरस्टाईल चा विग घातला जात होता तेव्हा तो व्यवस्थित सेट होत नव्हता व इमर्जन्सी म्हणून त्यावेळी अचानक हेअरबॅण्ड लावण्याची कल्पना सुचली व त्याप्रमाणे तिला हेअरबॅण्ड घातला गेला.

हा हेअर बँड एक वेगळा लुक तर देऊन गेलाच मात्र यामुळे वीग सुद्धा व्यवस्थित सेट झाला.म्हणूनच संपूर्ण कॉलेज लूकमध्ये अंजलीला हा हेअर बँड दिला गेला.त्यावेळी करण जोहरला कल्पना नव्हती की पुढे जाऊन हा हेअर बँड एक प्रकारची स्टाइल स्टेटमेंट बनेल.या चित्रपटामध्ये अंजली हे जे पात्र साकारले होते ते एक प्रकारचे टॉमबॉय व बिनधास्त मुलीचे पात्र होते.