Home » बाजरीची भाकरी खाण्याचे ‘८’ आरोग्यवर्धक फायदे,जे तुम्हालाही माहीत नसेल…
Uncategorized

बाजरीची भाकरी खाण्याचे ‘८’ आरोग्यवर्धक फायदे,जे तुम्हालाही माहीत नसेल…

थंडीचे दिवस सुरु झाले की घरातील सर्वांना बाजरीची भाकरी खाण्याची इच्छा होते.थंडीच्या दिवसात आपण बाजरीची भाकरी,खिचडी,थालीपीठ हे पदार्थ आवर्जून बनवले जातात.बाजरी ही ‘ग्लुटेन फ्री’ असल्यामुळे गहु आणि तांदळापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे म्हणून आपण बाजरीचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करू शकतो.

बाजरीची भाकरी आणि पिठ्ठल म्हंटल की सगळ्यांच्या तोंडाला आपोआप पाणी येत.आपल्या भागात बाजरी,नाचणी,तांदुळ आणि ज्वारी या धांण्याच्या भाकरी करतात.परंतु ग्रामीण भागात जास्त प्रमाणात बाजरीची भाकरी खाल्ली जाते.

खर म्हंटल तर भाजरीची भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत.भाजरीमध्ये फॉस्फरस,मॅग्नेशिअम,पोटॅशिअम ही पोषक घटक असतात.जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेमंद आहे.भारतामध्ये अनेक ठिकाणी भाजरीची भाकरी आवडीने खातात.विशेष म्हणजे वृद्ध व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी शक्तिवर्धक आहेरक्तदाब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते.

विशेष करुन बाजरी ही हिवाळ्यात खाल्ली जाते कारण बाजरीमुळे शरीरात उष्णता निर्माण होते.बाजरीमुळे शरीराला ऊर्जा मिळते शेती मध्ये राबणाऱ्या व्यक्तींसाठी बाजरी फायदेशीर ठरते.बाजरीचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत राहतात,हृदय निरोगी राहते,रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सगळ्यांना बाजरीची भाकरी अत्यंत पौष्टिक आहे.तर आज आपण बाजरी खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते बघणार आहोत.

१) हाडे मजबूत होतात : बाजरीच्या भाकरी सोबत पिठलं आणि कढी खुप चविष्ट लागते.बाजरीचे नियमितपणे सेवन केले तर हाडे मजबूत राहतात आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.थंडीच्या दिवसात बाजरी खाल्ली पाहिजे.

२) जळजळ होत असेल तर : खुप जणांना ऍसिडिटी आणि जळजळीचा त्रास असतो.काही जणांना वाटते भाजरी उष्ण असते त्यामुळे जळजळीचा त्रास होतो.परंतु थंडीमध्ये जळजळीचा त्रास कमी करण्यासाठी बाजरी फायदेशीर ठरते.

३) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते : बाजरीच्या भाकरीसोबत गूळ आणि तुप खाल्लेले अतिशय उत्तम.भाजरीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.बाजरी मध्ये असणारे तत्व कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करतात.हृदयासंबंधीत असणाऱ्या समस्या कमी होतात आणि बाजरीमध्ये असणारे पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम मुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

४) सर्दी-खोकला दुर होतो : सतत सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा.बाजरी खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होती त्यामुळे सर्दी-खोकला होत नाही.

५) वजन कमी करण्यासाठी : जर वजन वाढले असेल तर ते कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीचे आहारात नियमितपणे सेवन करावे.बाजरीमुळे वजन लवकर घटण्यास मदत होते.बाजरीची भाकरी खाल्यामुळे लवकर भुक लागत नाही पोट भरल्यासारखे वाटते.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते.

६) फायबर प्रमाणामध्ये राहते : आपण खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे फायबर.फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट लवकर भरते भुक लागत नाही.

७) डोळ्यांच्या आरोग्यासाठी : बाजरीचे नियमित सेवन केल्यास व्हिटॅमिन-ए मिळते.व्हिटॅमिन-ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे डोळ्यासंबंधित असणारे आजार दुर होतात तसेच रातांधळेपणा असेल तर तो कमी होतो.

८) त्वचेसाठी फायदेशीर : बाजरीमध्ये खनिजे भरपुर प्रमाणात आढळतात.त्वचेसाठी महत्त्वाचे खनिज म्हणजे झिंक.यामुळे त्वचा टवटवीत दिसते आणि मुरुमाच्या समस्या दुर होतात.शरीरामध्ये झिंक चे प्रमाण योग्य असेल तर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.