Home » तुम्हाला माहीत आहे का हे आहेत चिंच खाण्याचे फायदे…
Food & Drinks

तुम्हाला माहीत आहे का हे आहेत चिंच खाण्याचे फायदे…

चिंच म्हंटले किंवा चिंचेच नुसतं नाव जरी काढलं तरी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.कोवळ्या तुरट,आंबट चिंचा मीठाबरोबर खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो.चिंच फक्त तोंडाला पाणी आणणारी नव्हे तर चिंच आपल्या आरोग्यासाठी देखील खूप उपयोगी आहे.चिंच आरोग्याविषयी असणाऱ्या अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

चिंच खाल्ल्याने आपली भूक वाढते.आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी,टरफल यांचे खुप सारे औषधी गुणधर्म आहेत.पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट,गोड आणि तुरट असल्याने भाजीत,आमटीत किंवा वरणात वापरल्याने तोंड स्वच्छ होते आणि भाजीची चव देखील वाढते.

तर आज आपण चिंच खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत

१) ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे त्यानी थोड्या प्रमाणात चिंचेचे सेवन करावे.चिंचेमुळे वजन कमी होण्यास मदत होते.चिंच खाल्ल्याने हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.म्हणून आहारात चिंचेचा समावेश करा जमल्यास आठवड्यातून एकदा तरी चिंच खावी.

२) जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका असतो.चिंचेचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत मिळते. प्रवासाच्या वेळी बर्‍याच वेळा अस्वस्थ वाटत,मळमळ आणि उलट्या होतात अश्यावेळी चिंच खावी.चिंच खाल्ल्याने मनस्थिती सुधारते आणि उलट्यांचा त्रास कमी होतो.

३)  नियमितपणे चिंचेचे सेवन केल्याने केसांचे आरोग्य सुदृढ राहते आणि केसगळती थांबते.यामुळे केस मजबूत,लांब, दाट आणि काळेभोर होण्यास मदत होते.चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी,राइबोफ्लेविन आणि झिंक हे घटक असतात जे केसांसाठी चांगले मानले जाते.चिंचेचे सेवन केल्याने केस अधिक मजबूत होतात.याशिवाय चिंचेमध्ये स्कीन फ्रेंडली घटकही असतात जे त्वचेसाठी पोषक असतात.

४) शरीरातील पचनशक्ती कमी झाल्यास चिंच खाणे फायदेशीर ठरते.चिंचेमधील फाइबर,टार्टेरिक आम्ल आणि पोटॅशियम हे घटक पचनशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात.चिंचेमध्ये असणारे पौष्टिक घटक जे पचन होण्यासाठी मदत करतात.यामुळे पचन प्रणाली पूर्वी पेक्षा सुरळीत कार्य करते.

६) चिंचेच्या पाल्‍याच्‍या रस आणि तुरटी उगळून त्‍यात कापडाची पट्टी भिजवून डोळयावर लावल्‍यास नेत्रविकार बरा होतो. चिंचेच्‍या कोवळया पानांची चटणी व कोशिंबीर फारच रूचकर लागते.त्या चटणीमध्ये चवीला गुळ,हिंग व तिखट किंवा हिरवी मिरची वाटून टाकु शकतो. 

७) पडजीभ पडल्यावर चिंचोका थंड पाण्‍यात उगळून त्‍याचा लेप करावा आणि चिंचोक्याचे चूर्ण व हळद थंडपाण्‍यात मिसळून घेतल्‍याने गोवर व कांजण्‍यापासुन आराम मिळतो.चिंच,कांद्याचा रस आणि आल्याचा रस एकत्रित करून पिल्यास उलटी,जुलाब,पोटदुखी यापासुन आराम मिळतो.

७) मधुमेहाच्या संबंधित असणाऱ्या समस्येवर देखील चिंच गुणकारी उपाय आहे.चिंचेचे नियमित सेवन केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

८) चिंचामध्ये व्हिटामिन सी जास्त प्रमाणात असते.परंतु यामुळे गर्भवती महिलांसाठी समस्या देखील उद्भवू शकतात.म्हणूनच चिंचेचे योग्य प्रमाणात सेवन करावे.उलट्या आणि मळमळ यासाठी चिंच हा एक चांगला उपाय आहे.

९) चिंचेचे सूप तापासाठी फायदेशीर आहे.सर्दी झाली असल्यास चिंचेचे सेवन करू शकता.यासाठी चिंचेच्या सूपमध्ये मिरपूड घालुन प्यावी.

१०) चिंचेमध्ये लोह अधिक प्रमाणात असते.यामुळे चिंचेचे सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो आणि चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते.