Home » कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते आणि ते न येण्यासाठी काय करावे…
Food & Drinks Health Infomatic

कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते आणि ते न येण्यासाठी काय करावे…

Red onions in straw basket

भारतीय संस्कृती मध्ये कांद्याला खुप महत्त्व देतात.त्याच बरोबर कांद्याचे औषधी उपयोग पण आहे.कच्च्या कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कच्चा कांदा खाल्ल्याने पोट स्वच्छ होते.फळभाज्यांमध्ये अनेक गुणधर्म असतात.त्यामधून आपल्याला पौष्टिक तत्वे मिळतात.ही तत्वे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने रोग विकार दुर होतात.प्रत्येक भाजीचा स्वाद हा कांद्यामुळे वाढतो.आज काल हॉटेल मध्ये आणि घरात आयत्या मसाल्याला खूप मागणी आहे.त्यामध्ये एक म्हणजे कांद्यापासून बनणारे मसाले.

पण आपल्याला प्रश्न पडत असेल की कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते.यामागे काय कारण असेल,तुम्हाला माहीत आहे का तर आपण त्याविषयी जाणून घेवुया.डोळ्यामधुन पाणी येण्याचे कारण कांद्यामध्ये असणारे सायन-प्रोपेंथीयल-एस-ऑक्साइड नावाचं रसायन आहे. जे हवेत मिक्स झाल्यावर डोळ्याच्या संपर्कात आल्यावर त्यामुळे डोळ्यातून पाणी येते. एस-ऑक्साइड गॅस जेव्हा डोळ्यातील पाण्यात मिक्स होतो तेव्हा त्याचे रूपांतर सल्फ्युरिक ऍसिड मध्ये होत. यामुळे डोळ्यात जळजळ होते आणि डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होते. 

तर कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काय उपाय करावे आणि कांदा कापतांना कशी काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे डोळ्यातून पाणी येणार नाही त्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे आहेत… 

१) कांद्याचे दोन भाग करून पाण्यात भिजू घाला.कांदा पाण्यात भिजल्याने त्रासदायक घटक पाण्यात विरघळतात त्यामुळे डोळ्याला त्रास होणार नाही आणि डोळ्यातून पाणी येणार नाही. 

२) मेणबत्ती लावून कांदा कापला तर डोळ्यातून पाणी येणार नाही कारण कांद्यातून बाहेर पडणारा वायू मेणबत्ती कडे खेचला जातो.त्यामुळे मेणबत्ती लावून कांदा कापावा. 

३) कांदा ५ ते १० मिनिटे फ्रीझर मध्ये ठेऊन नंतर कापल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही.कारण कांद्यामध्ये असणारे उग्र घटक कमी होतात. 

४) सनग्लासेस घालून कांदा कापला तर डोळ्यातून पाणी येणार नाही कारण कांद्यातून निघणारा वायु डोळ्यात जाणार नाही. 

५) कांदा कापताना कांद्याचा खालचा पांढरा भाग काढून टाकावा आणि नंतर कांदा कापावा.जेणेकरुन डोळ्यातून पाणी येणार नाही.  

६) कांदा कापतांना च्युईंगम चघळल्याने देखील डोळ्यातून पाणी येणार नाही.