Home » दुधाचा चहा पिणे आहे आरोग्यासाठी अत्यंत घातक, ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना…!
Uncategorized

दुधाचा चहा पिणे आहे आरोग्यासाठी अत्यंत घातक, ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना…!

दूध घातलेला फक्कड, गरम चहा पिण्याची लज्जत ही चहाप्रेमींना माहित असते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही दुधाच्या चहाने होते. या चहामुळे तरतरी येते असे अनेकांचे म्हणणे आहे मात्र सकाळी अनाशापोटी दूध घातलेला चहा प्यायल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. आज आपण दूधाचा चहा पिल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत.

१) निद्रानाश :- चहा कॉफी इत्यादी पेयांमध्ये जेव्हा दूध समाविष्ट केले जाते तेव्हा त्यामधील कॅफेनची मात्रा अतिरिक्त प्रमाणात वाढते. कॅफेनच्या शरीरातील वाढत्या प्रमाणामुळे झोपेशी निगडित समस्या उद्भवतात. विशेषकरुन दुपारनंतर जास्त प्रमाणात दूधाचा चहा सेवन केला तर निद्रानाश या समस्येला तोंड द्यावे लागते.

२) त्वचेला हानी :- जास्त प्रमाणात दुधाच्या चहाचे सेवन केले तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः म्हणून चेह-यावर मुरुमाची समस्या अति प्रमाणात दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे निर्माण होतात. चहा मध्ये उष्णता निर्माण करण्याचे गुणधर्म असल्यामुळे ही समस्या उद्भवते.

३) चिडचिड :- योग्य प्रमाणात चहा घेतला तर शरीराला ताजेतवाने वाटते. मात्र जर अतिरिक्त प्रमाणात दुधाचे चहाचे सेवन केले तर यामुळे शरीरातील मेंदूच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो व तणाव निर्माण होऊन संबंधित व्यक्तीची चिडचिड होते.

४) बद्धकोष्टता :- दुधाच्या चहा मध्ये मोठ्या प्रमाणात कॅफेन आणि थायरोफिल हे घटक असतात. शरीरातील विषद्रव्ये उत्सर्जित करणे व टाकाऊ पदार्थांचे वहन कॅफेनमुळे अगदी सुरळीतपणे होते व थायरोफिल सुद्धा याच क्रियेसाठी उपयुक्त असते .यामुळे शरीराला डिटॉक्स केले जाते. शरीरातील विष द्रव्य बाहेर टाकली जातात मात्र या घटकांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरातील पाणी खूप मोठ्या प्रमाणात शोषले जाऊन डीहायड्रेशन ची समस्या उद्भवते व परिणाम बद्धकोष्टताही होऊ शकते.

५) रक्तदाब असंतुलन :- दूध घातलेल्या चहाच्या अतिसेवनामुळे रक्तदाबाच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात.