Home » दुपारच्या वेळी जास्त काळ झोपल्यामुळे होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, जाणून व्हाल थक्क…!
Health

दुपारच्या वेळी जास्त काळ झोपल्यामुळे होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, जाणून व्हाल थक्क…!

वामकुक्षी किंवा पावर नॅप ही संकल्पना आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारी मानले जाते. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या वेळी साधारण अर्धा तास इतका वेळ विश्रांती किंवा झोप घेतली असता ताजेतवाने वाटून स्फूर्ती येते. जेवणानंतर वामकुक्षी घेतल्यामुळे अन्नाचे पचनही सुरळीतपणे होते असेही मानले जाते.

मात्र या संकल्पनेला गैरसमजाने घेऊन दुपारच्या वेळी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झोपणे म्हणजे विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. काही व्यक्तींना दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर दोन ते तीन तास झोपण्याची सवय असते. यामुळे शरीरामध्ये आळस निर्माण होऊन झोपेचे चक्र बिघडते.

रात्रीच्या वेळी निद्रानाश किंवा शांत झोप न लागण्याची समस्या असलेल्या व्यक्ती जर दुपारच्या वेळी दोन किंवा तीन तास झोपत असतील तर त्यांना रात्री झोप येणे निश्चितच अशक्य असते. दुपारच्या वेळी जास्त काळ झोपल्यामुळे छातीत जळजळ होणे व काही वेळा तर हृदयविकाराच्या समस्या ही निर्माण होतात.

दुपारच्या वेळी जास्त काळ झोपल्यामुळे शरीरावर व डोक्यावर एक प्रकारचा थकवा निर्माण होतो व या थकवा मधून बाहेर पडण्यासाठी बरीचशी ऊर्जा खर्च होते. जेवणानंतर जास्त काळ झोपल्यामुळे पचनामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होऊन शरीरावर मेद निर्माण होतो. पूर्वीच्या काळी दुपारच्या वेळी झोपणे टाळावे असे म्हटले जात असे. या सांगण्यामध्ये निश्चितच तथ्य होते हे आधुनिक काळातील अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे.