Home » अंकूरलेले मूग खाण्याचे जबरदस्त फायदे,सांधीवातापासून ते त्वचेपर्यंत आहे फायदेशीर….
Health

अंकूरलेले मूग खाण्याचे जबरदस्त फायदे,सांधीवातापासून ते त्वचेपर्यंत आहे फायदेशीर….

अंकूरलेले मुग म्हणजे मोड आलेले मुग. दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मुग जर खाल्ले तर आपल्या आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात त्याविषयी जाणुन घेऊया.

अंकुरित मुगामध्ये प्रथिने,जीवनसत्त्व आणि खनिजे युक्त पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आणि महत्वाचे आहे.

अंकूरलेले मुग खाल्ल्यामुळे शरीराला भरपुर प्रमाणात फायबर आणि प्रथिने मिळतात. याव्यतिरिक्त बरेचसे घटक आपल्याला या मुगामधून मिळते.

शरीरामध्ये व्हिटॅमिन आणि प्रथिने यांची कमतरता असेल तर मोड आलेले मुग नक्की खावे. अंकुरित मुगामध्ये एंझाइम्स असतात जे पचन सुलभ करण्यास मदत करतात.

चेहऱ्यावरील मुरूम किंवा सुरकुत्या पडल्या असतील तर अंकूरलेले मुग खावे चेहऱ्याच्या कोणत्याही समस्येवर मुग अत्यंत उपयुक्त उपाय आहे.

तर जाणुन घेऊया अंकूरलेले मुग खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे…

१) अशक्तपणा : अंकुरित मुग हे आपल्या आरोग्यासाठी एक रामबाण उपाय आहे.यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मुगाचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.

२) केसगळती : अंकूरलेल्या मुगामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.ज्यामुळे आपल्याला केसांच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच रक्तभिसरण देखील चांगले होते.

३) बद्धकोष्ठता : अंकूरलेल्या मुगामध्ये फायबर भरपुर प्रमाणात असते.त्यामुळे पोटसंबंधीत असणाऱ्या समस्यापासून संरक्षण करतात.तसेच पचनसंस्था देखील व्यवस्थित राहते.

४) संधिवात : मोड आलेल्या मुगामध्ये अँटिइन्फलेमेंट्री गुण जास्त प्रमाणात असतात त्यामुळे सांधिवात असणाऱ्या रुग्णांनी मोड आलेले मुग खावे उपयुक्त ठरतात.

५) कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते : दररोज सकाळी नियमितपणे अंकूरलेले मुग खाल्ले तर शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पातळी नियंत्रणात राहते आणि तसेच यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.मोड आलेले मुग खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते.