Home » भिंतीवरी कालनिर्णय असावे म्हणत घरोघरी पोहचलेल्या ‘कालनिर्णय’ ची सुरुवात कशी झाली,जाणून घ्या रंजक इतिहास…
History

भिंतीवरी कालनिर्णय असावे म्हणत घरोघरी पोहचलेल्या ‘कालनिर्णय’ ची सुरुवात कशी झाली,जाणून घ्या रंजक इतिहास…

अगदी लहानपणापासून काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अगदी वर्षानुवर्षे त्याच क्रमाने घडत असतात व त्यांची आपल्याला सवय होऊन गेलेली असते. अशाच काही गोष्टींपैकी एक म्हणजे दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला घरांमधील कोणतेही कार्यक्रम, सुट्ट्या सणवार, स्थानिक यात्रा यांची नोंद ठेवणाऱ्या कालनिर्णयला आणण्याच क्रम होय.भारतातील प्रत्येक घराच्या खुंटीवर टांगले जाणारे कालनिर्णय ही वर्षानुवर्षांची ठेव आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कालनिर्णय ही केवळ तारीख बघण्याचे माध्यम नसून कालनिर्णयच्या मागील पानावर असलेल्या विविध माहितीपूर्ण लेखांचा खजिना सुद्धा आपल्यासाठी नेहमीच खुला असतो.कालनिर्णय चा इतिहास हा तितकाच रंजक असून याची काही वैशिष्ट्ये सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.कालनिर्णय 1973 साली स्थापन करण्यात आले.2022 साली कालनिर्णय चे स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत हे त्याचे वैशिष्ट्य होय.

बाजारामध्ये अनेक कॅलेंडर किंवा दिनदर्शिका उपलब्ध असल्या तरीही कालनिर्णयचा संपूर्ण देशभरामध्ये खप हा सर्वाधिक आहे असे असले तरीही कालनिर्णय कल्पनेतून सत्यात उतरवण्यासाठी जयंत साळगावकर यांना खूप कष्ट झेलावे लागले होते.ज्यावेळी कालनिर्णय बाजारात आणण्याची कल्पना घेऊन जयंत साळगावकर प्रकाशकांकडे जात असत तेव्हा त्यांना वेड्यात काढले गेले.

कारण त्या काळी दिनदर्शिका विकत घेण्याची प्रथा नव्हती तर दिनदर्शिका या अगदी मोफत उपलब्ध होत असत.मात्र कालनिर्णय निर्माण करण्यामागे जयंत साळगावकर यांनी अनेक अनोख्या कल्पना डोक्यात ठेवल्या होत्या. यापैकीच एक म्हणजे त्यांचे ज्योतिष शास्त्रावर असलेले गाढे प्रेम व अभ्यास त्यांना कालनिर्णय पंचांगाच्या स्वरूपामध्ये द्यायचा होता. या कल्पनेलाच अनेकांनी छेद दिला व या कल्पनेला वगळण्याचा सल्ला सुद्धा दिला.

आजघडीला कालनिर्णय हे भारतामधील तब्बल दीड कोटी लोकांच्या घरामध्ये दिसून येते व यामुळेच याचा आर्थिक फायदा हा वर्षानुवर्षे वाढतच आहे. काही कोटींच्या घरामध्ये कालनिर्णय च्या विक्रीतून पैसे मिळतात.मात्र कालनिर्णयच्या सुरुवातीच्या वर्षात जयंत साळगावकर यांनी यामध्ये केलेली गुंतवणूक ही अवघी दोन हजार सहाशे रुपये इतकी होती हे सांगितले तर आश्चर्य वाटेल.

त्यावेळी त्यांच्याकडे कर्मचारी वर्गामध्ये पाच लोक होते जे छपाई ,मांडणी यांसारख्या कामांमध्ये पारंगत होती. आज यांचा कर्मचारी वर्ग हा जवळपास दीडशे च्या घरामध्ये पोहोचला आहे.कालनिर्णय हा सुरुवातीला केवळ मराठी भाषेमध्ये छापण्यात आले होते व सुरवातीच्या वर्षी याचा खप हा केवळ चौदाशे प्रती इतका होता. सध्या कालनिर्णय हे भारतामधील सात भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कालनिर्णय हे भारतामधील दिनदर्शिकांच्या क्षेत्रामध्ये टाइपोग्राफी आणि कलरिंग तंत्रज्ञान वापरणारे पहिले कॅलेंडर आहे.
कालनिर्णय हे मार्केटिंग कसे असावे याचे एक अतिशय चांगले उदाहरण आहे. कालनिर्णयच्या जाहिराती आणि इमेज अतिशय आकर्षक पद्धतीने प्रेक्षकांसमोर आलेल्या आहेत.

कालनिर्णय मध्ये मागच्या पानावर प्रवास, रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या टीप्स आणि विविध प्रकारच्या पाककृती ने युक्त असे लिखाण असते. या लिखाणाचा वाचक वर्गही खूप मोठा आहे.कालनिर्णय चार मुख्य भर हा सुरुवातीपासून पंचांग आणि मुहूर्त वेळेवर होता.भारतीय लोक हे लग्नकार्य ,विविध प्रकारच्या सुख दुःखाच्या क्षणी पंचांग हे नक्कीच पाहतात व कालनिर्णय मध्ये या संदर्भातील अतिशय विस्तृत विवेचन असते.

कालनिर्णय हे पारंपारिक दिनदर्शिकांच्या चौकटींना छेद देणारे कॅलेंडर आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. काळाबरोबर तंत्रज्ञानाला ही कालनिर्णयने आत्मसात केले आहे.कालनिर्णय ची वेबसाईट सध्या उपलब्ध आहे.कालनिर्णय हे एप्लिकेशनच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे.एका मराठी माणसाने एक स्वप्न पाहून जुन्या नव्याचा संगम घालत समोर आणलेल्या या दिनदर्शिका व्यवसायाला नवीन पिढीसाठी एक आदर्श मानले जाऊ शकते.