Home » 19 जानेवारी 1990 या दिवशी काश्मिरी पंडितांसोबत नेमकं काय घडलं होतं…!
History

19 जानेवारी 1990 या दिवशी काश्मिरी पंडितांसोबत नेमकं काय घडलं होतं…!

19 जानेवारी 1990 हा दिवस मानवतावादी समुदाय,राष्ट्र किंवा व्यक्तींच्या दृष्टीने नेहमीच इतिहासामध्ये एक काळा दिवस म्हणून ओळखला जाईल.भारतीय स्वातंत्र्यानंतर 19 जानेवारी 1990 या दिवशी पहिल्यांदा एखाद्या भागामध्ये तेथील बहुसंख्य असलेल्या विशिष्ट समुदायाला विस्थापित होण्याची वेळ आली.जम्मू आणि कश्मीर ला जोडणाऱ्या जवाहर टनेल या मार्गावर जणू काही एखाद्या लष्करी छावणीचे किंवा लष्करी सीमेचे स्वरूप आले होते.

याच दिवशी कश्मीरमधील बहुसंख्य असलेल्या कश्मीरी पंडित यांना अतिशय क्रूर व अमानुषपणे अन्यायमूलक पद्धतीने कश्मीर मधून जम्मूकडे लष्करी छावण्यांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आणली गेली.या काश्मिरी पंडितांना आपल्या घर संपत्ती व जगण्याच्या अधिकारांवरच पाणी सोडून केवळ जीव वाचवण्यासाठी बेघर करण्यात आले.नक्की काय घडले होते या दिवशी की जेणेकरून दहशतवादी पद्धतीने त्याच मातीचा भाग असलेल्या काश्मिरी पंडितांना अशाप्रकारे विस्थापित करण्यात आले.या मागची काही तथ्य आज आपण जाणून घेणार आहोत.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला हे आपल्या वडिलांच्या म्हणजे शेख अब्दुल्ला यांच्या निधनानंतर 1982 साली मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.1983 साली फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली व या निवडणुकीत ते जिंकले.

1984 सालापर्यंत फारुख अब्दुल्ला व इंदिरा गांधी यांच्या मधील कडवटपणा इतका वाढला होता की फारूख अब्दुल्ला यांचे मेव्हणेच फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात गेले व त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स मधील काही उमेदवारांना वेगळे काढून स्वतः सरकार स्थापन केले.1986 साली  सर्वात प्रथम अयोध्येतील राम मंदिराचा चे कुलूप उघडण्यात आले व त्याचे पडसाद हे सर्वत्र उमटले व निश्चितच कश्मीर खोऱ्यात सुद्धा उमटले.याठिकाणी वातावरण अतिशय तंग झाले होते.मंदिर आणि मस्जिदींर अनेक धर्म प्रक्षोभक अशी पोस्टर्स लावली जाऊ लागली.

या वातावरणामध्ये कश्मीर मध्ये सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या हिंदू कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घेऊन घरी राहणे पसंत केले.येथील वातावरण दिवसेंदिवस अधिकच चिघळत होते व म्हणूनच गुलाम मोहम्मद शहा यांचे सरकार बरखास्त करण्यात आले व पहिल्यांदा कश्मीर खोऱ्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.1987 साली विधानसभा निवडणुकांच्या अगोदर येथील वातावरण अधिकच बिघडले.

फारूख अब्दुल्ला यांनी राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल काँग्रेस सोबत हातमिळवणी केली व यामुळे फारूख अब्दुल्ला यांनी काँग्रेससमोर शरणागती पत्करण्याची भावना येथील जनतेमध्ये निर्माण झाली व म्हणूनच या निवडणुकांमध्ये मुस्लिम युनायटेड फ्रंट हा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांच्या विरोधातील एक अधिक तगडा पक्ष म्हणून समोर आला.या निवडणुकांमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स 66 जागांवर विजय मिळवून सत्तेत आले व एक प्रभावी पक्ष म्हणून समोर आलेला मुस्लिम युनायटेड फ्रंट केवळ चार जागांवर समाधान मानून राहिला.

मात्र यावेळी मतदान मोजणी मध्ये सत्ताधारी पक्षाने घोटाळा केल्याचा आरोपही करण्यात आला व यामुळे अधिकच असंतोष निर्माण झाला.या नंतरच्या काळामध्ये जे के एल एफ हा कश्मीर खोर्‍यातील तरुणांना दहशतवादी कारवायांचे व शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारा गट समोर आला या ठिकाणी सर्वसाधारण काश्मिरी जनतेला रावळपिंडी च्या खोऱ्यात शस्त्रांचे प्रशिक्षण अगदी खुलेआमपणे दिले जात असे.1988 सालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कट्टरता वाद्यांनी चित्रपटगृहे,व्हिडिओ पार्लर,ब्युटी पार्लर यांसारख्या जागांना आपले निशाण्यावर घेतले व जे के एल एफने कश्मीर खोऱ्यात कश्मीर छोडो हा नारा बुलंद केला.

यानंतर कश्मीर खोऱ्यामध्ये हत्यांचे सत्र सुरू झाले.काश्‍मीर खोऱ्यामध्ये कश्मीरी पंडितांपैकी पहिली ह’त्या झाली ती 1989 साली भाजपाचे अध्यक्ष व पेशाने वकील असलेल्या बिकालाल टकलू यांची.यानंतर जे के एल एफच्या म्होरक्या ला फाशीची शिक्षा सुनावणा-या नीलकांत गंजू यांची सुद्धा ह’त्या करण्यात आली.या सत्याची जबाबदारी जेकेएल एफने घेतली होती व यानंतर कश्मीर खो-यामध्ये एकच नारा घुमत होता की एक तर आमच्या सोबत या किंवा या ठिकाणाहून निघून जा.

मुफ्ती मेहमूद यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले व तिच्या अपहरणाच्या बदल्यात जे के एल एफच्या चार अतिरेक्यांना सोडून देण्याची मागणी करण्यात आली व अखेरीस भारताच्या गृहमंत्रालयाला ही मागणी मान्य करावी लागली.1990 सालापर्यंत कश्मीर खोर्‍यातील कश्मीर पंडितांची स्थिती पाहता जगमोहन यांना पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल पद देण्यात आले.या अगोदरही 1983 साली जगमोहन हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते.

जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी जगमोहन यांची नियुक्ती ही दहशतवादी गटांसाठी खूपच असहनीय होती व फारूक अब्दुल्ला यांनीही या गोष्टीचा निषेध करत ते लंडनला निघून गेले.यानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांमध्ये वाढ करण्यात आली.जे के एल एफचे मुखपत्र असलेल्या आफताब वार्तापत्र म्हणजे कश्मीरी पंडितांनी कश्मीर खोरे सोडून द्यावे अशी धमकी देण्यात आली होती व या नंतरच 19 जानेवारी 1990 रोजी रात्रीच्या वेळी कश्मिरी पंडित यांची घरे जाळण्यात आली,त्यांना मारहाण करण्यात आली व घरातील महिला व मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले.

या रात्री खूप मोठ्या प्रमाणात कश्मिरी पंडितांची कत्तल करण्यात आली.ही रात्र जणू काही काळ रात्र ठरली होती.यानंतर कश्मीरी पंडितांनी आपला जीव वाचवण्यासाठी कश्मीर सोडण्याचे ठरवले.यानंतर असे सांगितले गेले की जगमोहन यांनी कश्मिरी पंडित यांना आश्वासन दिले होते की सध्या आपण आपल्या जीविताचे रक्षण करण्यासाठी संरक्षण छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा व तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांना पुन्हा एकदा कश्मीरमध्ये आणले जाईल मात्र हे आश्वासन कधीही पूर्ण झाले नाही.आजही कश्मिरी पंडित आपल्या भूमीमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत.

काश्मिरी पंडितांचे दुर्दैव इथे थांबले नव्हते.या ठिकाणी आश्रय घेतलेल्या महिला व मुलींना इतक्या मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक दडपण होते की वयाच्या तिशी मध्येच या महिलांना मेनोपॉज सारखे समस्यांना सामोरे जावे लागले.ज्या लहान मुलांनी आपले आई-वडील या संहारामध्ये गमावले होते त्यांच्या नातेवाईकांकडून या मुलांचे शोषण करण्यात आले व त्यापैकी 50 टक्के लहान मुले ही काही मानसिक समस्यांना बळी पडली.आपल्या घराला सोडून,उद्योग व्यवसाय सोडून बाहेर पडलेले कश्मीरी पंडित नंतरच्या काळात दिल्ली व जम्मूमध्ये उदरनिर्वाहासाठी झटू लागले मात्र आजही त्यांना काश्मीरमध्ये परतण्याची आस आहे.