Home » चेअर्स म्हणण्यामागे देखील आहे एक अजब-गजब इतिहास, चला तर मंग जाणून घेऊया…!
Infomatic

चेअर्स म्हणण्यामागे देखील आहे एक अजब-गजब इतिहास, चला तर मंग जाणून घेऊया…!

कोणत्या पार्टीची सुरवात किंवा सेलिब्रेशन हे सुरुवातीला वाइन,बियर किंवा कोल्ड्रिंकचा ग्लास एकमेकांवर आदळून चिअर्स म्हणून होते.कोणत्याही ठिकाणी अगदी घरगुती कार्यक्रमामध्ये सुद्धा दुधाचे ग्लासही चिअर्स म्हणून रिचवले जातात.यामागे नक्की काय अर्थ आहे याचा विचार क्वचितच केला जातो.चिअर्स म्हणजे एकत्र येऊन आनंद वाटून घेणे इतकी सहज भावना त्यामागे असते.गेली अनेक दशके किंवा शतके ही प्रथा विविध राष्ट्रांमध्ये समुदायांमध्ये पाळली जाते.मुळात चिअर्स म्हणण्यामागे नक्की काय कारण असावे हे आपण जाणून घेऊया.

१) चिअर्स म्हणण्याची प्रथा ही अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.यामागे एक कथा सांगितली जाते की पूर्वीच्या काळी समुद्रातील लुटेरे जहाजांवर खूप मोठ्या प्रमाणातस़पत्ती लूटमार करून आणत असत व एकमेकांमध्ये वाटून घेत असत.यावेळी या लूटृमार केलेल्या संपत्तीचे कमी हिस्से पडावेत म्हणून वाईन च्या ग्लास मध्ये विष मिसळले जात असे व या विषप्रयोग आधारे काही साथीदार मारून टाकले जात असत.

हे प्रयोग होऊ नयेत यासाठी एका ग्लासमधील वाईन ही दुसऱ्या ग्लास मध्ये पडल्यावर हा विषप्रयोग उघडकीस येऊ शकतो या उद्देशाने चिअर्स म्हणण्याची प्रथा सुरू झाली.त्याकाळी मद्य घेण्याचे ग्लास हे लाकडाचे बनवलेले असत व त्यांच्या आकारामुळे ही एका ग्लासातील मद्य हे दुसऱ्या ग्लास मध्ये सहजपणे पडत असे.

२) काही समुदायांमध्ये मनुष्य जन्म दिला म्हणून परमेश्‍वराचे आभार मानण्याची पद्धत म्हणून देवाला मद्य किंवा वाईन अर्पण करण्याची प्रथा आजही पाळली जाते.

३) वाइन बियर किंवा तत्सम पदार्थ हे व्यक्तीचा आनंद दर्शवण्यासाठी असतात. हे पेय घेऊन संबंधित व्यक्ती आनंदाचे जे मुक्तपणे प्रदर्शन करतात त्यामुळे मद्य हे आनंदाचे जणू काही प्रतीकच मानले जाते.कोणतीही व्यक्ती मद्तपान करताना ते मद्य डोळ्याने पाहू शकते,जीभेने त्याची चव घेऊ शकते ,त्याला हातामध्ये घेऊन अनुभवू शकते पंचेद्रियांपैकी ऐकण्याची सोयही चिअर्स हे वाक्य अगदी जोशात म्हणून केली जाऊ शकते.आनंदाला अगदी मुक्तपणे उपभोगण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी चिअर्स म्हटले जाते.

४) कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग मद्यपानाच्या वेळी केला जाऊ नये व एकमेकांवरील विश्वासार्हता कायम राहावी म्हणून चिअर्स म्हटले जाते.

५) प्रेतात्मा किंवा वाईट शक्ती आपल्या आजूबाजूला वावरतात असे अनेक ठिकाणी समज आहे व‌ काही समुदायांमध्ये मानले जाते. व या प्रवृत्ती आपल्याला कोणतीही पीडा देऊ नये म्हणून कोणत्याही आनंदाच्या वेळी चिअर्स म्हणून मद्याचे काही थेंब या प्रवृत्तींना दिले जावेत असाही उद्देश यामागे असतो.