Home » भगवान श्रीराम व सीतामाता यांची मूर्ती नेपाळच्या या ६ कोटी वर्षापूर्वीच्या खडकापासून का बनवण्यात येणार?
News

भगवान श्रीराम व सीतामाता यांची मूर्ती नेपाळच्या या ६ कोटी वर्षापूर्वीच्या खडकापासून का बनवण्यात येणार?

अयोध्या येथील राम मंदिर हा संपूर्ण हिंदू धर्मियांसाठी भावनिक विषय आहे. अयोध्या येथील राम मंदिराचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिरामध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या श्रीराम आणि सीतामातेच्या मूर्ती या अतिशय खऱ्याखुऱ्या व सजीव वाटतील याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. अयोध्या येथील राम मंदिर ही राम जन्मभूमी वाटेल याची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे असे या ट्रस्टच्या प्रमुखांनी सांगितले आहे.

मंदिरामध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या मूर्तींचे पावित्र्य व हुबेहूपपणा निर्माण करण्यासाठी या मूर्तींच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या शिलेची निवड सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली गेली आहे. या मूर्ती शालिग्राम या खडकापासून निर्माण केल्या जाणार आहेत. शालिग्राम हे नेपाळमध्ये जानकी धाम मधील गंडकी नदीमध्ये विशेष करून मिळतात.

शालिग्राम मिळवण्यासाठी नेपाळ सरकारने सुद्धा भारत सरकारला विषय सहकार्य केले आहे व या खास शालीग्रामांची निवड करण्यासाठी तज्ञांची समिती सुद्धा नेमण्यात आली होती. हे शालिग्राम तब्बल साडेसहा कोटी वर्ष इतके जुने आहे असा अहवाल या तज्ञांनी दिला आहे व पुढील लाखो वर्ष सुद्धा या मूर्ती अगदी त्याच स्वरूपात भक्कमपणे टिकून राहतील असे सुद्धा सांगितले जाते.

मूर्तींच्या निर्मितीच्या वेळी भगवान श्री राम व सीतामाता यांच्या त्वचेचा रंग सुद्धा अगदी नैसर्गिक पद्धतीने हुबेहूब निर्माण केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच नेपाळ सरकारने भारत सरकारकडे हे शालिग्राम सुपुर्द करण्याचे निश्चित केले आहे. नेपाळमध्ये या कामासाठी एक शिष्टमंडळ भेट देऊनही आले आहे. केवळ नेपाळमधील शालिग्राम नव्हे तर अन्य मूर्ती व मंदिरातील विविध निर्मितीसाठी राजस्थानमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण खडकही मागवले आहेत. 

नेपाळमधील जनक-धाम हे सीतेचे जन्मस्थान आहे असे मानले जाते. नेपाळमध्ये दरवर्षी केवळ राम जन्म नव्हे तर राम आणि सीता यांच्या विवाहाचा सोहळा सुद्धा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. शालिग्राम हे भगवान विष्णूंचा अवतार मानले जातात म्हणून या शालिग्रामांची निवड श्रीराम व सीता माता यांच्या मूर्ती निर्माण करण्यासाठी केली आहे. या शालिग्रामांचे वजन 350 टन इतके आहे‌.