Home » घरामध्ये असणाऱ्या पालीला कंटाळलात,तर ‘हे’ घरगुती उपाय करुन बघा घरात एकही पाल दिसणार नाही…
Article Uncategorized

घरामध्ये असणाऱ्या पालीला कंटाळलात,तर ‘हे’ घरगुती उपाय करुन बघा घरात एकही पाल दिसणार नाही…

पाल हा शब्द ऐकताच कित्येक जणांना किळसवाणे वाटते आणि काही जणांना भीती देखील वाटते.पाल हा एक असा प्राणी आहे जी नुकसान करीत नाही. बहुतेक भिंतींवर किंवा जमिनीवर फिरत असते.जर पाल अन्नात पडली तर मात्र खुप हानीकारक आहे.घरात पाल असेल तर छोटे कीटक,किडे खाऊन टाकते.

मार्केट मध्ये पालीला मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विषारी लिक्विड मिळतात तरी ते आपल्यासाठीधोकादायक असल्यामुळे काहीजण ते घेणे टाळतात.अशा वेळी घरातील पाल पाळण्यासाठी तुमच्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्याच्या साहाय्याने पाली नाहीशा होऊ शकतात.

चला तर बघूया पालीला घरातून पळून लावण्यासाठीचे काही घरगुती उपाय…

१) अंडीच्या साल घरात अडकून ठेवल्यास पाल येत नाही.अंड्याच्या सालीमध्ये वास नसला तरी अंड्याच्या सालाचा आकार पाहून पालीला वाटते की धोकादायक किंवा वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे म्हणूनच ती अंड्याच्या सालीकडे येत नाही.घरामध्ये जिथे पाली असेल तिथे अंड्याची साल ठेवावी.असे केल्यास घरात पाली राहणार नाही.

२) स्प्रे बॉटल घेऊन त्यामध्ये कांद्याचा रस आणि पाणी भरुन घ्यावे.आणि त्या पाण्यात लसणाचा रस टाकावा.जिथे पाल असेल तिथे तो रस स्प्रे मारावा.पालीला हा वास असह्य होतो पाल तेथून पळ काढते.

Garlic.

३) स्लाईसमध्ये कांदा कापून लाईटजवळ लटकून द्यावा. यामुळे लाईटजवळ असणारी मांडून पाल पळून जाईल. कांद्यामध्ये असणाऱ्या सल्फरच्या च्या दुर्गंधीमुळे पाल तेथून पळ काढते.

४) मोर पिस पाहून पाल गोंधळून जाते आणि तिला मोर पिस सापसारखा वाटतो हा साप आपल्याला खाऊन टाकेल असे तिला वाटते म्हणूनच मोर पिस असलेल्या ठिकाणी पाल कधीच येत नाही आणि पाली पासून मुक्तता मिळेल.

५) घरामध्ये कीटकांचा त्रास होऊ नये म्हणून आपण डांबर गोळ्यांचा वापर करतो.परंतु यासोबतच घरातील पाली कमी करण्यासाठी देखील डांबर गोळ्या उपयुक्त ठरतात.

६) पाणी आणि काळी मिरची पावडर एकत्र करून त्याची पेस्टीसाईड तयार करून.ती किचन,बाथरुम आणि इत्यादी ठिकाणी शिंपडून द्यावी.या वासामुळे पाल पळून जाते.

७) कॉफी पावडर आणि तंबाखू एकत्र मिसळुन त्याचे लहान लहान गोळे बनवावे आणि ते पाल जिथे येईल तिथे ठेवावे.हे मिश्रण पालीने खाल्ले तर पाल मरून पडेल किंवा अथवा तेथून पळ काढेल.

८) फ्रिजमधील बर्फाचे थंड पाणी पालीवर फेकावे असे दोन-तीन दिवस करत रहावे.गारवा सहन न झाल्यामुळे पाल आपोआप घर सोडून जाईल.

९) घराच्या कोपऱ्यांमध्ये मिरची पावडर स्प्रे केल्यामुळे पाल पळून जातात.हा पाल पळवून लावण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे.