Home » उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेले ड्रॅगन फ्रुट खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे…
Uncategorized

उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेले ड्रॅगन फ्रुट खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे…

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठी खुप उपयुक्त आहे.यामुळेच आता ड्रॅगन फ्रुट ची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चालली आहे.ड्रॅगन फ्रुटचा उपयोग जॅम,आईसक्रीम,जेली आणि वाईन करण्यासाठी देखील होत आहे.तसेच सौंदर्य प्रसाधनामध्ये देखील फेस पॅक म्हणून ड्रॅगन फ्रुट चा वापर करण्यात येतो.ड्रॅगन फ्रुट थायलंड,इस्राईल आणि श्रीलंकेमध्ये जास्त लोकप्रिय आहे.यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हे फळ अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरते.तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरते.त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवते आणि पचनक्रिया सुरळीत होते.

ड्रॅगन फळाची थायलंड,व्हिएतनाम,इस्राईल आणि श्रीलंका या देशात व्यापारी तत्त्वावर लागवडी केल्या जात आहेत.मात्र आता भारतातही ड्रॅगन फ्रूट येऊन पोचले आहे.काही प्रमुख आशियाई देशांत त्याची लागवड केली जात आहे.गुजरात,आंध्रप्रदेश,कर्नाटक या राज्यात सुद्धा कमी क्षेत्रावर व्यापारीदृष्ट्या या पिकाची लागवड होत आहे.तसेच महाराष्ट्रातील कमी पावसाच्या क्षेत्रात जसे की सोलापूर,पुणे, सांगली  येथे देखील व्यापारी तत्त्वावर या पिकाची लागवड सुरू करत आहे.

ड्रॅगन फ्रुट हे एक प्रकारचे फळ आहे.हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे लोकांमध्ये त्याची फार उत्सुकता वाढली आहे.ड्रॅगन फ्रुट फळांचे शास्त्रीय नाव हायलोसीरीयस अंडाटस असून हे फळ कॅक्टस वर्गातील वनस्पती आहे.पाण्याची कमतरता असली तरीदेखील ही झाडे जळून जात नाहीत.मुरमट जमिनीमध्ये देखील आपण या फळाची लागवड करु शकतो.फळांचा कमी हो तील मात्र झाडे जिवंत राहतात.या पिकाला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी असून पीक लागवडीवर जास्त खर्च येत नाही.

ड्रॅगन फळ मधुमेह,संधिवात,कर्करोग,दमा या सारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत करते आणि अन्नपचन शक्ती वाढवण्यासाठी मदत होते.ड्रॅगन फ्रुटमध्ये जीवनसत्त्वे,खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.डेंग्यू आणि मलेरिया या आजारात ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला देतात.

तर जाणून घेऊया ड्रॅगन फ्रुट खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे…

१) रोगप्रतिकारकशक्ती वाढते : हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती आणि पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.या फळामध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असते.तसेच कॅल्शीयम,पोटॅशियम,लोह आणि विटॅमीन-बी असते.बाहेरुन जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि काळ्या रंगाच्या बिया असतात.हे फळ म्हणजे वेगवेगळ्या आजांरावर गुणकारी उपाय आहे. या फळामध्ये विटॅमिन-सी भरपूर प्रमाणात आहे.विटॅमीन-सी असल्यामुळे रोग प्रतीकार शक्ती वाढण्यास मदत होते.

२) त्वचा विकार पासुन सुटका : ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.चेहऱ्यावरील मुरुम,केस गळणे,उन्हामुळे काळवंडलेली त्वचा या सारख्या समस्या वर हे फळ एक रामबाण उपाय आहे.हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि हे फळ खाल्ल्याने त्वचा टवटवीत आणि  तजेलदार दिसते.

३) पोटासंबंधित समस्यावर उपायकारक : ड्रॅगन फ्रुटमध्ये जास्त फायबर असल्यामुळे पोट साफ राहते.पोट साफ असल्यामुळे  व्याधी संबंधित असणाऱ्या समस्या नाहीशा होतात.यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित राहतो आणि पुर्ण इंद्रिये सुरळीत काम करतात.त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.म्हणजे डायिबटीस धोका कमी होतो.कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकासापासून बचाव होतो.

४) हिमोग्लोबीन वाढते : यामधील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स,ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही.ह्यातील लोह  हेमोग्लोबिन वाढवते आणि एनिमेया सारख्या आजारापासून दुर ठेवते.गर्भवती महिलांचे हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा हे फळ खाल्ले तर हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.तसेच लठ्ठपणा आणि चरबी कमी होते.

५)  संधिवात आणि डेंग्यू वर उपायकारक : या फळाची चव आंबट आहे तरी देखील सांधीवाताच्या वेदना कमी होतात.तसेच ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यामुळे दात व हाडे मजबूत राहतात.तसेच ह्या फळांचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आणि हाडे मजबूत होतात.डेंग्यू या आजारावर देखील ड्रॅगन फ्रुट फायदेशीर आहे.

६) कॅन्सर पासून सुटका : अतिशय महत्त्वाचे म्हणजे हे फळ कन्सर ला आटोक्यात आणण्यासाठी फायदेशीर आहे.या फळामध्ये लायाकोपेन नावाचे विकर आहे हे विटॅमीन-सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते.ह्या फळाच्या साली मध्ये पॉलीफेनोल आणि रसायने असतात जे कॅन्सर पासून संरक्षण करतात.