Home » जाणुन घ्या तुप खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे…
Uncategorized

जाणुन घ्या तुप खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे…

जो खाईल तूप त्याला येईल रूप,खाईल तुपाशी नाही तर उपाशी अश्या म्हणी तुम्ही ऐकल्याच असतील.त्याचे कारणही तसेच आहे पूर्वीचे लोकं रोजच्या जेवणात तुपाचा भरपूर वापर करत होते.त्यामुळे त्याचे आरोग्यसुद्धा अतिशय चांगले आणि तंदुरुस्त राहायचे.ते धष्टपुष्ट दिसायचे.रोजच्या जेवणात तूप वापरण्याचे अनेक फायदे आहेत. 

पूर्वीच्या काळी खेड्यातच नव्हे तर शहराम्ध्येसुद्धा लोणी विकायला येत होते.याचे कारण खेड्यांमध्ये बहुतेक जणांकडे शेती असल्याने त्यांच्याकडे गायी-म्हशी हमखास पाळल्या जात होत्या.त्यामुळे घरोघरी दुध असायचे आवश्यक तेवढे दूध घरी ठेवून इतर दुधाचे दही बनवले जायचे.त्या दह्यापासून लोणी तयार करुन त्यापासून तुप तयार करुन बाजारात विक्रीसाठी आणायचे.त्या काळी दुधाचे उत्पादन भरपूर होत असल्याने तुपाला कमी भाव होता.

त्यामुळे पूर्वीचे लोक आपल्या जेवणात नियमित तुपाचा वापर करायचे.त्याचमुळे पूर्वीच्या लोकांची शरीर प्रकृती आताच्या लोकांच्या तुलनेत धष्टपुष्ट आणि तंदुरुस्त होती.पूर्वीच्या तुलनेत आताच्या माणसांचे जीवन ऐशोआरामाचे झाले आहे. परिणामी लठ्ठपणासारखे आजार जडले आहे.त्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आज अनेकजण तुप खाणे टाळतात.परंतु हा लोकांचा गैरसमज आहे.शुद्ध तुप खाण्याचे अनेक फायदे आहेत.तूप खाल्ल्याने शरीरातील उष्मांक वाढतो.

त्यामुळे डॉक्टर आजारी व्यक्तींना जेवणात तूप खायला सांगतात. बाळंतपणात महिलांना शुद्ध तुपाचा शिरा करून खायला देतात.त्याचे कारण हेच की, तुपामुळे शरीरात ताकद निर्माण होते.शुद्ध तुप खाण्याचे अनेक फायदे आहेत.तूप खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो तसेच दररोज नियमित जेवणामध्ये तुपाचा वापर केल्यास वात आणि पित्ताचा त्रास होत नाही.आहारामध्ये नियमित तूप खाल्ल्याने पचनक्रियासुद्धा चांगली राहते. 

तुम्ही बघितलेच असेल हिवाळ्यात तुपापासुन तयार केलेले लाडू,हलवा,शिरा असे पदार्थ खाण्याची पद्धत आहे.कारण तुपातून आपल्या शरीराला उष्णता मिळते.शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी तूप फायदेशीर आहे.

तर आज आपण जाणून घेणार आहोत तुप खाण्याचे फायदे…

१) स्मरणशक्ती वाढते : तूप खाण्याचे खुप सारे फायदे आहेत.तुपाचा मेंदूच्या आरोग्यावर देखील चांगला फायदा होतो.ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते.नियमित तुप खाल्ल्यामुळे तुम्हाला भविष्यात अल्झामर किंवा स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी असतो.

२) मुळव्याध आणि सांधेदुखी वर आराम : तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी असते ज्यामुळे सांध्याचे कार्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.नियमित आहारात तुपाचे सेवन केल्यास किंवा रात्री दुधात एक चमचा तूप टाकून पिल्याने सौचाला साफ होते.ज्यामुळे मुळव्याधीचा त्रास कमी होतो.

३) डोळ्यासंबधित समस्या दूर होतात : डोळ्यांच्या समस्या असतील तर डोळ्यांमध्ये तूप टाकल्यामुळे चांगली झोप लागते.शिवाय तुपापासून तयार केलेले काजळ डोळ्यांमध्ये लावल्यास देखील डोळ्यांना आराम मिळतो.तुपाचे सेवन केल्याने डोळ्यावरील ताण कमी होतो. 

४) पोटाचे आजार दुर होतात : पोटात अल्सरमुळे झालेले व्रण तुपाने बरे होतात.त्यामुळे अल्सर असणाऱ्या रुग्णांनी तूपाचे सेवन केल्यास पोटात होणाऱ्या वेदनांपासुन आराम मिळतो.पचनक्रिया सुधारते,अपचन आणि गॅसचा त्रास कमी होतो.

५) स्नायू लवचिक होतात : आयुर्वेदानुसार गायीचे तूप आपल्या शरीरातील अवयवांना पोषक घटकांचा पुरवठा करण्याचे कार्य करते आणि आपल्या मेंदूची कार्यप्रणालीही चांगली ठेवण्यास मदत करते.तसेच तूप नैसर्गिक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते.यामध्ये अतिशय मर्यादित प्रमाणात पौष्टिक चरबीचा समावेश असतो.म्हणूनच तुपामुळे मेंदू आणि शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते.शरीरामध्ये लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी गरम दुधासह गायीच्या तुपाचे सेवन सुध्दा अगदी उपयुक्त ठरते.

६) ह्रदयविकारापासुन आराम : आजकाल ह्रदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे.अशावेळी तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.तुपाचे सेवन केल्यास ते लुब्रिकेट काम करुन रक्तवाहिन्या मधील समस्या दूर करतात.