Home » केसांमधील कोंड्याचे प्रमाण दूर करण्यासाठी काय कराल…
Uncategorized

केसांमधील कोंड्याचे प्रमाण दूर करण्यासाठी काय कराल…

आजकाल केसांमध्ये कोंडा होणे हि समस्या अगदी सामान्य झाली आहे.केस व्यवस्थित न धुणे,वेगवेगळे हेअर ऑइल,शाम्पू आणि अनेक केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरून केसात मोट्या प्रमाणात कोंडा होतो.केसांमध्ये कोंडा होऊ नये,तसेच केसांच्या अनेक समस्या पासून वाचण्यासाठी केसांची काळजी घ्यावी लागते.तसेच केमिकल युक्त प्रॉडक्ट्स चा वापर करणे टाळावे.

केमिकल प्रॉडक्ट्सचा केसांवर तात्पुरता फरक पडतो मात्र हे प्रॉडक्ट्स केसांसाठी हानिकारक असतात. केसांमध्ये कोंडा झाल्यावर डोक्यात खाज येते.खाजवल्यामुळे डोक्यामध्ये जखमाही होऊ शकतात.यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात.कोंड्याच्या समस्येमुळे आपले केस तुटतात आणि पातळ होऊ लागतात.

आठवड्यातून दोनदा केसांची मालिश केल्यावर कोंड्याचे प्रमाण कमी होते.केसांमधील कोंड्याचे प्रमाण दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत.तर चला बघूया कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी चे उपाय… 

१) खोबरे तेल आणि  लिंबू : १ चमचा खोबरे तेल आणि त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिक्स करून याचे मिश्रण केसांना लावावे.ज्या दिवशी हा उपाय कराल त्यादिवशी केस स्वच्छ धुवावे आणि नंतर हे मिश्रण लावावे.हा उपाय आठवड्यातून एकदा केला तरी भरपूर प्रमाणात कोंडा कमी होईल. 

२) दही आणि लिंबू : दह्यामुळे केस बळकट होतात आणि चमकदार पण होतात.त्याचबरोबर कोंड्याचे प्रमाण देखील कमी होते.२ चमचा दही,१ चमचा लिंबाचं रस आणि १ चमचा खोबरे तेल यांचे मिश्रण करून हे मिश्रण ज्या दिवशी केस धुणार त्यादिवशी लावावे.

३) अंडी आणि लिंबू : अंडी हि आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे.अंडी हि आपल्या केसांसाठी पण खूप फायदेशीर आहे.अंड्यामधील पांढरा बलक आणि त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिक्स करून याचे मिश्रण करून केसांना लावावे आणि एक तासांनंतर केस पाण्याने स्वच्छ धुवावे.त्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होईल तसेच केस चमक देखील मारतील.      

४) तुळस आणि आवळा : तुळशीचे पाने आणि आवळ्याची पावडर याचा लेप तयार करून केसांची मालिश करायची.आवळ्याची पावडर आणि तुळस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. 

५) बेकिंग सोडा : २ ते ३ चमचा बेकिंग पावडर आणि पाणी याची पेस्ट तयार करून केसांच्या मुळाला लावावे.यामुळे देखील कोंडा नाहीसा होतो.  

६) कांदा : १ कांदा कट करून त्याची मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी आणि नंतर ती चाळणीने गाळून त्यामधून जो रस निघतो तो केसांना लावावा.यामुळे कोंड्याचे प्रमाण खूप कमी होईल आणि केस गळण्यापासून देखील सुटका मिळेल.  

७) कडलिंबु : कडुलिंबाचा पाला पाण्यात उकळून घ्यावा.त्या पाल्याचा लेप करुन केसांना लावावा.४० मिनिटांनी केस धुवावेत असे केल्याने देखील कोंडा कमी होतो