Home » राजकारणातील ‘किंग मेकर’ म्हणून ओळखले जाणारे ‘प्रशांत किशोर’ यांच्याबद्दल या तुम्हाला माहित आहे का?
Article

राजकारणातील ‘किंग मेकर’ म्हणून ओळखले जाणारे ‘प्रशांत किशोर’ यांच्याबद्दल या तुम्हाला माहित आहे का?

गेल्या काही दशकांपासून भारतामध्ये राजकारण हे पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठीचे क्षेत्र बनल्याचे चित्र समोर उभे राहिले आहे.राजकारणामध्ये सत्तेवर येण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सर्व धोरणांचा वापर केला जातो.लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या राजकारण्यांच्या मागे यशस्वी राजनीती आखणारे अनेक चाणक्य व राजनीतिज्ञ असतात.बिहारच्या राजकारणामध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी उदयास आलेले पिके अर्थातच प्रशांत किशोर हे युनायटेड जनता दलाचे राजनीतिज्ञ अचानक खूप चर्चेत आले होते.मात्र २०२० साली त्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.हे प्रशांत किशोर नक्की आहेत कोण व राजकारणामध्ये त्यांचा इतका बोलबाला का झाला हे आज आपण जाणून घेणार आहोत.प्रशांत किशोर यांचा जन्म बिहारमधील बक्सार येथे १९७७ साली झाला.

१) प्रशांत किशोर हे संयुक्त दक्षिण आफ्रिके मधील युनायटेड नेशन्स येथील चांगल्या पदाची नोकरी सोडून २०११ साली भारतामध्ये परत आले व त्यांनी भारतीय राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा निश्चय केला.२०११ साली गुजरात येथील नरेंद्र मोदींच्या निवडणुकीतील रणनीती आखणा-या टीम मध्ये सामील झाले.गुजरात निवडणूकांचा प्रचाराची जबाबदारी प्रशांत किशोर यांना देण्यात आली होती.

२) २०१४ साली प्रशांत किशोर यांनी भाजपा सोडून बिहारमधील नितीशकुमार आणि लालू यादव यांच्या महा गटबंधन यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली.२०१५ साली त्यांनी पुन्हा एकदा वायएसआर काँग्रेस मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

३) २०१५ साली बिहारमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांनी खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली.बिहार बहार है,नितीश कुमार है ही घोषणा पिके यांनीच काढली होती व ही त्यावेळी चांगलीच गाजली होती.त्याच प्रमाणे हर घर दस्तक हा मंत्र सुद्धा पिके यांच्या कुशाग्र बुद्धी मधून आला होता.

४) प्रशांत किशोर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली असता त्यांचे वडील हे सरकारी डॉक्‍टर आहेत तर त्यांच्या आई गृहिणी आहे. प्रशांत किशोर यांच्या पत्नी जान्हवी दास या आसाम मधील गुवाहटी जिल्ह्यामध्ये डॉक्टर की ची प्रॅक्टिस करतात व या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे.

५) प्रशांत किशोर यांची राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या राजकीय विचारसरणी आणि ज्ञानामुळे चांगलीच चर्चा होती.२०१५ साली बिहारमधील निवडणुकांमध्ये नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता असेही म्हटले जात होते व म्हणूनच त्यांना ‘सीएम मेकर’ या नावाने संबोधले जात असे.त्यांचे हे काम लक्षात घेता त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ही बनवले गेले व त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले गेले होते.

६) लोकप्रिय कार्यक्रम चाय पे चर्चा युनिटी मंथन या सर्वांच्या मागे प्रशांत किशोर यांचे डोके होते.प्रशांत किशोर हे इंडियन पॉलिटिकल एक्शन कमिटी नावाची संघटना चालवतात या संघटनेमार्फत ते पॉलिटिकल ब्रँडिंग भाषणे प्रचार मोहिमा इत्यादींचे आयोजन व आखणी करतात.

७) प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्या मधील मतभेदानंतर नितीश कुमार यांनी असे वक्तव्य केले होते की अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच प्रशांत किशोर यांना पक्षांमध्ये घेण्यात आले होते.नितीशकुमारांचे या वक्तव्यावर प्रशांत किशोर हे चांगलेच संतापले होते व त्यांनी असे विचारले होते की नितीश कुमार इतके खोटे वक्तव्य कसे करू शकतात मला पक्षांमध्ये घेण्यासंदर्भात नितीशकुमार यांनी जे काही सांगितले आहे ते पूर्णपणे खोटे असून माझा रंग नितीशकुमार यांच्या सारखा नाहीये.