Home » या ठिकाणी आजही धडधडते भगवान श्रीकृष्णाचे हृदय,जाणून घ्या यामागील रहस्यमय कथा… 
History

या ठिकाणी आजही धडधडते भगवान श्रीकृष्णाचे हृदय,जाणून घ्या यामागील रहस्यमय कथा… 

शरीर सोडल्यावर हृदयाची गती देखील शांत होत असते.परंतु हे एक अद्वितीय रहस्य आहे की भगवान श्रीकृष्णाने त्यांचे शरीर सोडले परंतु त्यांचे हृदय अजूनही पृथ्वीवर धडधडत आहे असे म्हणतात.आपण काही दिवसांपूर्वी बघितले होते की आजही भगवान श्रीकृष्ण यांच्या शरीरातील एक अवयव पृथ्वीवर आहे तर आज आपण हा अवयव कुठे आहे हे बघणार आहोत.तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल परंतु पुराणात दिलेली माहितीनुसार असे सांगितले आहे.असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण यांचे हृदय आजही या ठिकाणी धडधडत आहे.

कथा अशी आहे की,द्वापार युगामध्ये भगवान श्री विष्णूने जेव्हा श्री कृष्ण म्हणून अवतार घेतला होता तेव्हा ते त्यांचे मानवी रूप होते.सृष्टीच्या नियमानुसार मृत्यू देखील निश्चित होता.

महाभारत युद्धाच्या ३६ वर्षानंतर श्रीकृष्णाने आपला देह सोडून दिला.पांडवांनी जेव्हा अं’ति’म संस्कार केले तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांचे संपूर्ण शरीर अग्नीसाठी समर्पित होते परंतु त्यांचे हृदय हे धडधडत होते.या आगीमध्ये भगवान श्रीकृष्ण यांचे त्या हृदय जळले नाही.पांडवांनी जेव्हा हे दृश्य बघितले तेव्हा ते चकित झाले.तेव्हा आकाशातून एक आवाज ऐकू आला तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचे हृ’द’य आहे त्याला समुद्रामध्ये वाहू द्या.

हे ऐकल्यावर पांडवांनी भगवान श्रीकृष्ण यांचे हृदय समुद्रात सोडले.असे देखील म्हणतात की पाण्यात वाहणारे भगवान श्रीकृष्ण यांचे हृदय एक लठ्ठेचे रूप धारण केले आणि पाण्यात वाहत वाहत ओरिसाच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचले.त्या रात्री भगवान श्रीकृष्ण इंद्रद्युम्न राजाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की ते लठ्ठेच्या रूपात समुद्रकाठी उभे आहे.

सकाळी उठल्याबरोबर राजा इंद्रद्युम्न भगवान कृष्णाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले व त्याने लठ्ठला नमस्कार केला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन आले.विश्वकर्माजींनी या लठ्ठमधून भगवान जगन्नाथ बालभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ती बनवली.भगवान श्री जगन्नाथ यांची मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनवली आहे आणि दर १५ ते १९ वर्षांनी बदलली जाते.

यालाच पुन’र्ज’न्म म्हणूनही ओळखले जाते.जेव्हा हा वि’धी करतात तेव्हा पूर्ण शहराची वीज खंडित केली जाते.वीज खंडित केल्यानंतर पुजारी देवाचा चेहरा बदलतो.यावेळी पुजारीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि त्याचे हात कपड्यांनी गुंडाळलेले असतात असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण यांचे हृदय अजूनही या मूर्तीखाली धडधडत आहे.

भगवान श्रीकृष्णाचा चेहरा बदलत असताना,हातांना कपड्याने गुंडाळणे,डोळे बांधलेले असणे आणि सपूर्ण शहराची वीज खंडित करणे यामागे अशी श्रद्धा आहे की जर कोणी चुकून त्याला पाहिले तर त्याचा मृ’त्यू होईल.म्हणून विधी करण्यापूर्वी ही दक्षता घेतली जाते.मूर्ती बदलणारे पुजारी सांगतात की जेव्हा जेव्हा ही प्रक्रिया होते त्या वेळी असे दिसते की जणू ससा काळेवर आत उडी मारत आहे. जरी हातात कपडे बांधलेले असले तरी काहीही स्पष्टपणे माहित नाही.