Home » या ‘६’ अभिनेत्रींनी दिला होता शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार…
Entertainment

या ‘६’ अभिनेत्रींनी दिला होता शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार…

सुपरस्टार शाहरुख खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. यावेळी शाहरुख खान अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. मुलगा आर्यन खान ड्र’ग्ज प्रकरणी अटकेत आहे.सध्या तो आर्थर रोड कारागृहात आहे. मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे आणि तो मंजूर देखील झाला आहे.शाहरुख खानने आपल्या टॅलेंट आणि मेहनतीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, मात्र अनेकवेळा अनेक अभिनेत्रींनी शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार दिल्याचे दिसून आले आहे. त्यात श्रीदेवीपासून ते करिश्मा कपूर, सोनम कपूर, कंगना राणौत, दक्षिण अभिनेत्री समंथा रुथ आणि हेमा मालिनी यांच्या नावांचा समावेश आहे.जाणून घेऊया या मागचे कारण…

१) सोनम कपूर : बॉलिवूड लाईफच्या रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूरने देखील शाहरुख खानसोबत कधीही काम केलेले नाही. शाहरुख आणि त्याची केमिस्ट्री पडद्यावर नीट बसणार नाही, असा तिचा विश्वास आहे. प्रेक्षकांनाही ही जोडी आवडणार नाही.

२) कंगना राणावत : बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणावत ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने चित्रपटसृष्टीतील तीनपैकी एकाही खानसोबत काम केलेले नाही. कंगना राणौतला ‘झिरो’ चित्रपटाची ऑफर आली होती, पण कंगनाने ते करण्यास नकार दिला होता. कंगना म्हणाली होती की ती शाहरुख खानची फॅन आहे, पण मी माझी मर्यादा कधीच ओलांडणार नाही.

३) करिश्मा कपूर : करिश्मा कपूरने शाहरुख खानचा ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट नाकारला. करिश्माशिवाय ट्विंकल खन्ना, रवीना टंडन, तब्बू आणि उर्मिला मातोंडकर यांनीही हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

४) समंथा : समंथाला दक्षिण चित्रपट दिग्दर्शक एटली कुमार यांनी शाहरुख खानसोबत चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु अभिनेत्रीने वैयक्तिक कारणांमुळे चित्रपट करण्यास नकार दिला. चित्रपटाचे नाव जरी फायनल झाले नसले तरी ‘लायन’ या नावाने तो रिलीज होऊ शकतो असे बोलले जात आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साऊथची सुपर लेडी नयनताराला देण्यात आली होती.

५) हेमा मालिनी : अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की हेमा मालिनी यांना शाहरुख खान ‘ओव्हरअॅक्टिंग’ करत असल्याचे वाटते. अशा परिस्थितीत हेमा मालिनी यांनीही त्यांच्यासोबत काम केले नाही.

६) श्रीदेवी : शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात श्रीदेवी पाहुण्यांच्या भूमिकेत दिसली होती. यशराजच्या सुपरहिट चित्रपट ‘डर’मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर सर्वप्रथम श्रीदेवीला आली होती, मात्र अभिनेत्रीने ती ऑफर नाकारली. श्रीदेवीने ही भूमिका नाकारली होती कारण तिने यापूर्वीच्या अनेक चित्रपटांमध्ये अशी भूमिका साकारली होती.