Home » पोळा हा सण का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा…  
Festival

पोळा हा सण का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा…  

श्रावण महिना म्हंटल की या महिन्यात वेगवेगळे सण असतात.श्रावण महिन्याच्या शेवट शेवट ला पोळा हा सण येतो.सर्जा आणि राजाचा सण म्हणजेच बैलपोळा.शेतकरी राजाला ह्या सणाची खुप आतुरतेने वाट पाहत असतो.त्याच बरोबर पोळा कधी आहे याची देखील उत्सुकता लागलेली असते.पोळा कधी आहे.चला तर मग जाणुन घेऊया पोळा सण का साजरा करतात.

या वर्षी हा सण ६ सप्टेंबर सोमवार आला आहे.वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी शेतीकामापासून दूर ठेवतात.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन अंघोळ घालतात.

पोळा हा सण कसा साजरा करतात

पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा आहे.शेती या व्यवसाय जास्त प्रमाणात बैलांवर अवलंबून असतो.त्यामुळे बैलांप्रति असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा करतात.

पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना असे आमंत्रण देतात ‘आज आवतन घ्या आणि उद्या जेवायला या’ दुसऱ्या दिवशी त्यांना नदी किंवा ओढा यावर अंघोळ घातली जाते त्यांनतर त्यांना गोठयात नेऊन चारा पाणी देतात.या दिवशी बैलांची पुजा करुन त्यांची मिरवणूक काढतात.वर्षातला हा असा एकच दिवस असतो ज्या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. त्यांच्या कडून कोणतेही काम करुन घेतले जात नाही.

नंतर त्यांच्या शिंगांना हिंगुळ लावतात आणि त्यांच्या खांद्यावर तूप आणि हळद लावून शेकतात यालाच खांदा मळणी असे म्हणतात.त्यानंतर त्यांच्या अंगावर नक्षीकाम केलेली शाल टाकतात.डोक्याला बाशिंग,गळ्यात कवड्यांची किंवा घुंगराची माळ घालतात.पायात करदोड्याचे तोडे घातली जातात. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाला वेगवेगळ्या पद्धतीने सजवतो.त्यानंतर नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी,कढी,भजेहे बनवलेले असते.

गावातील मंदिरासमोर सगळ्या गावातील बैलं एकत्र जमतात त्यानंतर गावातील एका व्यक्तीला पूजा करण्याचा मान असतो तो पुजा करतो आणि तोरण तोडतो त्यानंतर पोळा फुटतो काही ठिकाणी बैलांची शर्यत लावून तोरण तोडले जाते. त्यालाच पोळा फुटला असे म्हणतात.पोळा फुटल्यावर बैलांना गावात घेऊन जातात.

तेव्हा बैलांच्या पायवर पाणी टाकून त्यांची पुजा केली जाते.त्यांना धान्य आणि नैवेद्य खायला देतात.त्यानंतर घरातील जो व्यक्ती बैल घेऊन आला त्याचे औक्षण करतात.

अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या प्रत्येक कामात सोबत असणारा,धान्य पिकवण्यासाठी वर्षभर कष्ट करणाऱ्या आणि  शेतकऱ्यांचा मित्र आणि सखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बैलांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात.

बैलपोळा कुठे कुठे साजरा केला जातो

प्रामुख्याने बैलपोळा हा सण महाराष्ट्र,छत्तीसगड आणि मध्यप्रदेश येथील शेतकरी वर्ग साजरा करतात.महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात हा सण साजरा केला जातो.पोळ्याच्या दिवशी ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीच्या बैलाची पूजा करतात.प्रत्येक राज्यात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.कुठे गोधन,तर कुठे पोंगल,तर कुठे बेंदूर अस्या नावाने ओळखला जातो.

पौराणिक कथेनुसार 

पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू हे भगवान श्रीकृष्ण यांच्या रुपात धर्तीवर अवतरले होते तेव्हापासून कंस ने कृष्णाचे प्राण घेन्यासाठी प्रयत्न सुरू केले.एकदा कंसाने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी पोलासुर राक्षसाला पाठवले होते तेव्हा कृष्णाने पोलासुर राक्षसाचा वध केला.तो दिवस श्रावण अमावस्येचा होता.याच दिवशी पोळा साजरा केला जातो आणि याच दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते.