Home » योग्य प्रमाणात बियर पिल्याने मानवी शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे…
Food & Drinks

योग्य प्रमाणात बियर पिल्याने मानवी शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे…

आता काही जणांना नक्कीच प्रश्न पडला असेल की खरच बियर पिण्याचे फायदे असु शकतात का? दारूचे पण कुठे फायदे असतात का यापासून होते ते फक्त नुकसानच हे पण बरोबर आहे…पण नुकसान केव्हा होते? जेव्हा आपण बियरचे अतिरिक्त सेवन करतो तेव्हा.

बिअर हे जगातील सर्वात जास्त लोकप्रिय पेय आहे.चहा आणि कॉफी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारे पेय म्हणजे बिअर.बियर हे  एक अल्कोहोलिक पेय असून आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार केले जाते.बियर पिणे तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर हे चुकीचे आहे पण केव्हा अतिरिक्त सेवन केल्यावर…परंतु काही प्रमाणात बिअरचे सेवन केले तर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

बियर कशी तयार करतात…

बियरमध्ये बार्ली म्हणजे जवाचा अधिक प्रमाणात वापर केलेला असतो.परंतु काही वर्षांपासून बीअर तयार करण्यासाठी गहू,मका,सातू आणि तांदळाचाही वापर केला जात आहे.धान्यामध्ये असणाऱ्या पिष्टमय पदार्थांच्या किण्वन प्रक्रियेतुन बियर तयार केली जाते.बिअर म्हटले की आपण बियरला दारूची उपमा देतो.कोणत्याही वस्तूचा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापर केला तर तो आपल्याला विनाशकडेच घेऊन जात असतो मग ती कोणतीही वस्तू असो.

त्यामधीलच एक म्हणजे बिअर.बियरचे जास्त प्रमाणात सेवन कराल तर बियर नक्कीच विनाशकारी आहे…परंतु आपण योग्य प्रमाणात बियरचे सेवन केले तर बियर ही कोणत्या औषधी पेक्षा कमी पण नाही.बियर पिण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे बियरचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीररावर अनेक प्रकारचे फायदे होतात असे दिसून आले आहे नाहीतर शरीरासाठी बियर चांगली असते असे म्हणून तिचे अतिरिक्त सेवन करशाल.

चला तर मग जाणून घेऊया बिअर पिण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे…

१) मुतखड्यासाठी फायदेशीर : बिअर सेवन केल्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारन्यास मदत होते.बियर ही किडनीमध्ये तयार होणाऱ्या मुतखड्याला फोडण्याचे काम करते. बिअरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते.यामुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी बियरची मदत मिळते.

२) किडनी स्टोन : बिअर मध्ये अल्कोहोल चे प्रमाण ५% ते ६% असून पाण्याचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे मूत्र हे पातळ स्वरूपात तयार होते आणि यामुळे किडनी मधील स्टोन वितळण्यासाठी मदत होते.तसेच मूत्राच्या पातळ प्रवाहामुळे वितळलेला स्टोन मूत्रा वाटे बाहेर पडण्यास मदत मिळते.

३) केसांसाठी फायदेशीर : बिअरचे सेवन केल्यास सौंदर्याला देखील फायदे होतात.बिअर पिल्याने त्वचेला तर फायदे होतातच परंतु त्याचबरोबर बियर ही केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते.बिअर हे एक प्रकारचे  प्राकृतिक हेअर कंडिशनर आहे ज्यामुळे केस मुलायम होतात.जर तुम्हाला तुमचे केस लांब,सुंदर आणि मजबूत असावे असे वाटत असेल तर बिअरचे सेवन फायदेशीर ठरते.

४) झोपेची समस्या असल्यास: बरेचशे लोक झोपेच्या आजाराने त्रस्त असतात.असे असेल तर बिअरचे सेवन रात्रीच्या जेवणापूर्वी कारावे यामुळे मेंदूच्या पेशी सक्रिय होतात आणि आपल्याला लवकर झोप लागते.

५) हाडांसाठी फायदेशीर : बीअरमध्ये सिलिकॉन नावाचा घटक भरपूर प्रमाणात असते.ज्यामुळे हाडांचा विकास होण्यासाठी बियरची मदत मिळते.एका संशोधनुसार सिद्ध करण्यात आले होते एखाद्या व्यक्तीने दिवसाला एक किंवा दोन ग्लास बीअर चे सेवन केले तर त्याची हाडं फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण कमी होते असे नमूद करण्यात आले होते.याचबरोबर बीअरचे अतिसेवन केले तर हाड फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण देखील वाढू शकते हे देखील सांगण्यात आले होते.

६) हृदय विकार आणि मानसिक ताण : बिअर चे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते.त्यामुळे हृदयाचे ब्लॉकेज दूर होतात.यामुळे हृदया संबंधित असणारे विकार कमी होतात.तसेच धावपळीच्या जीवनात बराचसा मानसिक ताण येतो हा ताण कमी करण्यासाठी बिअर उत्तम उपाय आहे.

७) त्वचेसाठी फायदेशीर : बिअरमध्ये व्हिटॅमिन-ई असते हे एक प्रभावी अँटिऑक्सिडेन्ट आहे.त्यामुळे बियर निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी उपयुक्त ठरते.कमी प्रमाणात बिअरचे सेवन केल्यास त्वचेचे वय कमी दिसु लागतेआणि त्वचादेखील तजेलदार आणि तेजस्वी वाटते.

८) कर्करोगावर फायदेमंद : कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी बीयरचे सेवन फायदेमंद ठरते.बिअर तयार करताना फळांचा आणि धान्यांचा रस मिसळल्यामुळे बियारमध्ये विशेष औषधी गुण असतात या गुणधर्मामुळे आपला कर्करोगापासून बचाव होतो.