Home » तरुण वयामध्ये केस पांढरे का होतात? जाणून घेऊया त्यामागची कारणे आणि त्यावरील उपाय…
Health

तरुण वयामध्ये केस पांढरे का होतात? जाणून घेऊया त्यामागची कारणे आणि त्यावरील उपाय…

आजकाल कमी वयातच केस पांढरे झाले हे सगळीकडे ऐकायला मिळते.माणसाचे सौंदर्य खुलवण्यासाठी केस खूप महत्वाचे असतात.काळेभोर आणि दाट केस तुमची समोरच्या व्यक्तीवर वेगळीच छाप निर्माण करते.आणि फक्त काळे आणि दाट केस असनेच महत्वाचे नाही त्याचबरोबर केसांची एक वेगळीच पद्धत असेल तर अजूनच खुलून दिसतात.२०१९ मध्ये आयुष्मान खुरानाच्या आलेल्या बाला चित्रपटात केसांवर च भाष्य केलेले आहे.

तरुण वयात पांढरे केस झाल्यावर अनेकांना आपलं वय वाढल्याची जाणीव किंवा भीती निर्माण करून देते.केस पांढरे झाल्यामुळे ते लपवण्यासाठी हेअर डाय करणे,केस काळे करणे पांढरे केस लपवणे.केसांवर केमिकल युक्त प्रॉडक्ट चा वापर केला तर केस कमकुवत होतात.

कमी वयात केस पांढरे का होतात त्यामागील काही कारणे…

१) आजकाल केसांना सिल्की आणि शायनी बनवण्यासाठी मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू आणि हेअर कंडिशनर उपलब्ध आहे.त्याच्या जाहिराती देखील केल्या जातात.आणि त्या बघून आपण ते प्रॉडक्ट्स खरेदी करतो त्यामुळे देखील केस पांढरे होतात.

२) रात्री उशिरा पर्यंत जागरण करणे दिवसभर काम करणे हे चुकीचे आहे.कारण शरीरासाठी झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे.झोप पूर्ण न झाल्यामुळे देखील पांढरे केस होऊ शकतात.

३) कधी कधी केस पांढरे होणे हा अनुवांशिक हि असू शकते. कुटुंबातील आजी-आजोबांचे,आई-वडिलांचे केस पांढरे असतील तर तुमचे देखील होऊ शकतात.

४) वाढत्या प्रदुषणामुळे आणि धुळीमुळे मातीच्या संपर्कात आल्याने केसांचा काळेपणा जातो आणि केस पांढरे होतात. 

५) नशीले पदार्थ अल्कोहोल,धुम्रपान जास्त घेतल्यामुळे देखील केस पांढरे होतात.या पासून दूर राहिलेलं चांगलं. 

६) शरीरामध्ये प्रोटीन लोह व्हिटॅमिन बी -१२ या पोषक तत्वांची कमी असल्यामुळे देखील केस पांढरे होतात.

 तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्या केसांचा काळा रंग हा मेलानिन पिगमेंटमुळे असतो.हे पिगमेंट केसांच्या मुळाशी असते.मेलानिन चे प्रमाण कमी झाले कि केस पांढरे होऊ लागतात.    

केस पांढरे होण्या मागे अनेक कारणे असू शकतात.पण केस पांढरे होण्यापासून थांबवणे आपल्या हातात आहे.केस पांढरे होण्यापासून आणि काळे राहण्यासाठी काही घरगुती उपाय आहे ते तुमची मदत करू शकतात.

चला तर मंग जाणून घेऊया कोणते पदार्थ लावल्याने पांढऱ्या केसांच्या समस्या दूर होतात… 

१) आवळा : आवळा हा फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर याचा नियमित वापर केलातर पांढऱ्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.आवळा फक्त खाऊच नका तर त्याचे पावडर मेहंदी मध्ये मिक्स करून केसांना लावले तर केस काळे होण्यास मदत होईल.आवळा बारीक करून खोबरे तेलामध्ये मिक्स करून केसांना लावले तरी देखील केसांना खूप फायदेयुक्त आहे.दररोज १ आवळा खाल्ला तरी केसांसाठी खूप चांगला असतो.  

२) दही : पांढरे होणारे केस कमी करण्यासाठी दह्याचा देखील उपयोग करतात.५० ग्राम मेहंदी आनि ५० ग्राम दही दोन्ही सम प्रमाणात घेऊन ते मिक्स करून त्याचा लेप केसांना लावावा.हा उपाय आठवड्यातून एकदा केला तरी खूप फायदेशीर ठरतो. 

३) कोरफड : केसांना कोरफडीचे तेल लावल्याने केस पांढरे होत नाही.कोरफडीच्या तेलामध्ये लिंबु रस घालून त्याची पेस्ट करावी आणि केसांना लावावी. 

४) बटाटा : बटाट्यामध्ये स्टार्च असतं.त्याचा उपयोग केसांसाठी केला तर पांढरे केस कमी होतील.पाण्यात बटाट्याच्या काही साली उकळून घ्याव्यात मंग थंड करून केसांना लावा.

५) आले : आल्याची पेस्ट घ्यावी त्यामध्ये कच्च दुध मिक्स करून केसांना लावावं.त्यानंतर १/२ तासाने केसांना शाम्पू लावून केस स्वच्छ धुवावेत.असे केल्याने लवकरच पांढऱ्या केसांपासून सुटका मिळेल.