Home » ॲल्युमिनियम फाईल पेपरमध्ये पदार्थ पॅक करत असाल तर सावधान, भोगावे लागतील ‘हे’ दुष्परिणाम…!
Health

ॲल्युमिनियम फाईल पेपरमध्ये पदार्थ पॅक करत असाल तर सावधान, भोगावे लागतील ‘हे’ दुष्परिणाम…!

आजकाल हॉटेलिंगचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र अनेकदा हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा निवांतपणे घरी खाण्यासाठी आपण जेवण पार्सल मागवतो. अशावेळी हे जेवण ॲल्युमिनियम फॉईलने बनलेल्या डब्यांमध्ये किंवा कागदामध्ये येते. या अल्युमिनियम फॉईलमुळे जेवण दीर्घकाळ गरम राहण्यास मदत होत.

याच कारणामुळे आजकाल लहान मुलांचे डबे,नोकरदार वर्गाच्या डब्यांमध्ये सुद्धा ॲल्युमिनियम फाईल मध्ये बांधलेले पदार्थ आढळून येतात. ॲल्युमिनियम फॉईलने आपल्या शरीरात काही अपाय सुद्धा आहेत. आज आपण अल्युमिनियम फॉईल मुळे आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचे अपाय होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

1) ॲल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण बांधले असता ॲल्युमिनियम हा घटक अन्नपदार्थांमध्ये अधिक प्रमाणात शोषला जाऊन अल्झायमर सारख्या आजारांचा धोका अधिक वाढतो.

2) शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात ॲल्युमिनियम गेले असता हाडांच्या आरोग्यासाठी फारसे हितावह नसते. तसेच मेंदूतील पेशींना त्यामुळे अपाय होतो.

3) गरम जेवण ॲल्युमिनियम ऑइल मध्ये बांधले असता काही काळानंतर यामधील तेल व मसाल्यांची प्रक्रिया ॲल्युमिनियम फॉईल मध्ये रासायनिक घटकांमध्ये होते‌. हे आपल्या शरीरासाठी निश्चितच चांगले नाही.

4) ॲल्युमिनियम फॉईलने खाद्यपदार्थ पॅक केले असता पुरुषांच्या वंध्यत्व सारख्या समस्या निर्माण होतात.

5) ॲल्युमिनियम फॉईलने बांधलेले पदार्थ रोज खाल्ल्यास प्रतिकार शक्ती कमी होते असे आढळून आले आहे.