Home » केस दाट आणि लांब होण्यासाठी असणारे काही घरगुती उपाय…
Health

केस दाट आणि लांब होण्यासाठी असणारे काही घरगुती उपाय…

प्रत्येकाला वाटते आपले केस लांब,चमकदार,सिल्की आणि सुंदर असले पाहिजे असे कोणाला वाटत नाही.छोटछोटे असणारे केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप सारे उपाय करत असतो.कधी-कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी मार्केट मध्ये जाऊन महाग प्रोडक्ट्स खरेदी करतो.पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांब आणि दाट होतातच असे नाही.जर आम्ही तुम्हाला सांगितलं की हे सर्व उपाय न करता सुद्धा केस लांब करता येऊ शकतात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.आपल्या घरच्या घरी असे काही उपाय करू शकतो ज्यामुळे केस महिनाभरात लांब आणि दाट होण्यास मदत होते.तर आज असेच आज आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत…

१) कोरफड : उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या आरोग्याबरोबर केसांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात केस जास्त प्रमाणात कोरडे पडतात.अशावेळी ही समस्या दूर करण्यासाठी कोरफड अतिशय महत्वाची आहे.कोरफडमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.जे टाळूवर येणारी खाज कमी करण्यास मदत करते आणि तसेच केसांना कोरफड लावल्याने केस गळती कमी होते.

१) रीठा : रीठा केसातील कोंड्याच्या समस्येवर देखील चांगला उपाय आहे.केसांतील कोंडा काढून टाकण्यासाठी रीठा पाण्यात भिजत ठेवून त्याची पेस्ट बनवावी नंतर ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावावी.या हेअर पॅकच्या नियमित वापर केल्यास कोंड्याची समस्या दुर होते.आंघोळ करण्यापूर्वी आपण पेस्ट केसांमध्ये लावून नंतर केस धुवू शकता.

२) मध : तुमचे केस बळकट आणि मजबूत होण्यासाठी मध हा उपयुक्त पर्याय आहे.केसांना मधामध्ये पोषक तत्व मिळतात.मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांना हानी पोहचवण्यापासून संरक्षण देतात. 

३) बदाम : बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी -7 आणि अँटीऑक्सिडंट् असते.बादामाचे तेल वापरल्याने आपले केस निरोगी,हायड्रेटेड आणि मजबूत राहतात.

४) अंडी : अंड्यामध्ये प्रोटीन्स,सल्फर,झिंक,लोह,सिलेनियम,फॉस्फरस आणि आयोडिन या सर्व घटक असतात.केसांच्या वाढीसाठी अंड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पोषक तत्वे असतात. नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यासाठी अंडे हे अत्यंत फायदेशीर असून हे चांगल्या प्रकारे केसांना मॉईस्चराईज करून पोषण देते.अंड्यामध्ये विटामिन ए,ई आणि डी असल्यामुळे केसगळती थांबते आणि केस चमकदार होतात.

५) लिंबू : केस वाढीसाठी लिंबू आणि दाट होण्यासाठी लिंबू हा अतिशय फायदेशीर उपाय आहे.लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे लिंबु रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकते आणि दाह कमी करू शकते.लिंबाचा वापर केल्यामुळे केस राखाडी होण्यापासून रोखता येते.

६) कांदा : कांद्याच्या रसामुळे केस गळती कमी होते,केसांमधील कोंडा दुर होतो आणि केसांची वाढविण्यासाठी देखील होते.केस वाढविण्यासाठी कांदा देखील फायदेशीर आहे.तीव्र वास असूनही कांदा हा केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आणि डोक्यातील कोंडाची समस्या नष्ट करण्यासाठी खुप उपयुक्त आहे.कांद्यामध्ये असणारे सल्फर केसांच्या रोमांना पोषण करण्यास मदत करते.

७) दही : दही केसांच्या मुळांना लावून केसांचीमसाज करावी.दह्यामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत.यामुळे टाळूच्या त्वचेशी संबंधित असणारे संसर्ग दूर करण्यासाठी दही हा एक गुणकारी उपाय आहे.कोरडे तसेच निर्जीव केस,केसांमध्ये खाज सुटणे अशा अनेक समस्या दह्यामुळे कमी होऊ शकतात.

८) कढीपत्ता : कढीपत्त्याच्या पानांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीनचे भरपूर प्रमाणात असते. कढीपत्त्याची पाने केसांसाठी पोषक आहेत.या पानांची पेस्ट तयार करून आपल्या टाळूली आणि केसांना लावावी जवळपास पाच मिनिटे केसांचा मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत.केस धुण्यासाठी हर्बल शॅम्पू किंवा शिकाकाईचा उपयोग करावा.