Home » महेंद्रसिंग धोनीच्या प्रेयसीच्या मृ’त्यू चे खरे कारण आले समोर…!
Entertainment

महेंद्रसिंग धोनीच्या प्रेयसीच्या मृ’त्यू चे खरे कारण आले समोर…!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन कूल कर्णधार व क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी चे चाहते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. महेंद्रसिंग धोनीने अतिशय संघर्ष करून स्वबळावर स्वकर्तृत्वावर भारतीय क्रिकेट संघामध्ये आपले स्थान निर्माण केले.धोनीच्या आक्रमक आणि त्याच वेळेस संयमी अशा संमिश्र स्वभावामुळे भारतीय क्रिकेटला एक वेगळी दिशा मिळाली.

महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेटच्या मैदाना मध्ये जितक्या तडाखेबाज पद्धतीने फलंदाजी करतो तितकाच तो वैयक्तिक आयुष्याबद्दल संवेदनशील  असतो. जाहिरात क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक ब्रँडचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून तो कार्यरत आहे.धोनीचे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य सुद्धा नेहमीच चर्चेमध्ये असते. मध्यंतरी महेंद्रसिंह धोनीचे आयुष्यावर एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाच्या निमित्ताने महेंद्रसिंह धोनीच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी त्याच्या चाहत्यांना नव्याने कळल्या होत्या.धोनीची पत्नी साक्षी धोनी आणि मुलगी झिवा यांच्यासह त्याची अनेक छायाचित्रे प्रसारमाध्यमांमध्ये वेळोवेळी झळकत असतात. महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी यांचा प्रेमविवाह आहे व त्यांची लव्हस्टोरी व हे कपल चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. मात्र महेंद्र सिंह धोनी चे पहिले प्रेम साक्षी नव्हती तर प्रियांका झा ही त्याची प्रेयसी होती.

प्रियांका आणि महेंद्रसिंह धोनी हे महेंद्रसिंह धोनीच्या करियरच्या सुरुवातीला एकमेकांना डेट करत होते व महेंद्र सिंह धोनी चे प्रियांका वर निरतिशय प्रेम होते. आणि त्या दोघांमध्ये परस्पर सामंजस्य सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.काही कालावधी नंतर महेंद्र सिंह धोनी आणि प्रियांका  एकमेकांसोबत विवाहही करणार होते मात्र खूपच कमी वयात प्रियांकाचा एका कार अपघातामध्ये दुर्दैवी मृ’त्यू झाला.

महेंद्रसिंह धोनी हा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधारा पैकी एक मानला जातो. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या अनेक ट्रॉफी आपल्या नावावर करून घेतल्या आहेत. या सर्व यशामध्ये सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात प्रियंकाने त्याला खूपच चांगली साथ दिली होती.

प्रियांका झासोबत महेंद्र सिंह धोनी ने अनेक चांगले क्षण व्यतीत केले होते .काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंह धोनीचा एका मुली सोबत चा एक फोटो व्हायरल झाला होता. या छायाचित्रांमध्ये तो एका मुलीसोबत एका निवांत ठिकाणी बसलेला दिसून येतो. ही मुलगी म्हणजे त्याची माजी प्रेयसी प्रियांका असल्याचे सांगितले जाते. महेंद्रसिंह धोनी हा प्रियांकाच्या अकाली मृ’त्यूनंतर खूपच कोलमडून गेला होता व दुःखाने खचला होता.

त्यामुळे त्याच्या जवळच्या व्यक्तींना तो आता क्रिकेट सोडून एकांतामध्ये वेळ घालवणे पसंत करेल असे वाटू लागले होते. मात्र आपल्या निश्चयाचा पक्का असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आपल्या या दुःखातून स्वतःला सावरून क्रिकेटवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले. प्रियंकाच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी त्याने क्रिकेटवर जास्त लक्ष दिले. एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटा नंतर प्रेक्षकांना साक्षीच्या अगोदर महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यामध्ये अजून एक मुलगी होती हे नव्यानेच कळले.

हा चित्रपट संपूर्णपणे महेंद्र सिंह धोनी च्या दृष्टिकोनातूनच बनवला गेला होता व त्यामुळे प्रेक्षकांना त्याला समजून घेणे अधिक सोपे गेले.महेंद्रसिंह धोनी हा आपल्या कुटुंबासोबत खूपच आनंदात असून तो क्रिकेट मधून दूर गेल्यानंतर आपला वेळ हा निरनिराळ्या उद्योगांमध्ये व व्यवसायांमध्ये व्यतीत करत असल्याचे दिसून येते.