Home » नियमित दोरी वरच्या उड्या मारल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!
Health

नियमित दोरी वरच्या उड्या मारल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!

शेवटचे दोरी उड्या मारल्याचे तुम्हाला कधी आठवते. आपली दोरीवरच्या उड्या मारण्याची गंमत बहुतांश वेळा आपल्या लहानपणीची असते. दोरी उड्या हा एक लहानपणीचा आवडता खेळ म्हणून पाहिला जातो. मात्र याच लहानपणीच्या खेळाद्वारे आपण आत्ताही खूप उत्तम प्रकारे व्यायाम करू शकतो हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. दोरी उड्या मारण्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊया.

1) दोरी उड्या हा प्रकार एक उत्तम कार्डिओ व्यायाम प्रकार आहे यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत मिळते तसेच हृदयविकाराच्या झटक्यांपासूनही संरक्षण मिळते.

2) दोरी उड्या हा व्यायाम प्रकार एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण व उपयुक्त मानला जातो. दोरी उड्या मारत असताना आपल्या हात डोळे व मेंदू या तिघांचाही समतोल साधणे आवश्यक असते. यामुळे मेंदूच्या डाव्या व उजव्या बाजूंचाही समतोल साधला जातो यामुळे एकाग्रता वाढण्यास सहाय्य मिळते.

3) दोरी उड्या  व्यायामामुळे एकंदरीतच आपल्या शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते व शरीरातील थकवा दूर होतो. कोणतेही कार्य करण्यासाठीची ऊर्जा पुन्हा निर्माण करणे हे दोरी उड्यांमुळे शक्य होते.

4) योग्य प्रमाणात दोरी उड्या हा व्यायाम प्रकार केला तर आपले मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधारू शकत. दोरी उड्यांमधून इंडोर्फिन मूड चांगला करणारे हार्मोन स्त्रवते यामुळे डिप्रेशन नैराश्य व उदासपणा दूर होतो.

5) दोरी उड्या हा वजन पेलण्याशी निगडित व्यायाम प्रकार आहे. यामुळे आपल्या हाडांची घनता वाढते व ओस्टोपोरासिस सारख्या आजार होण्यापासूनही बचाव मिळतो.